बलात्कार करून तब्बल सात वर्षे देत होता पोलिसांना गुंगारा, मात्र ‘ ह्या ‘ चुकीने आला पोलिसांच्या जाळ्यात

शेअर करा

कोरोनाच्या निमित्ताने अनेक याआधी आपण कधी ऐकले देखील नसतील असे प्रकार देशभरात घडत आहेत . असाच एक प्रकार महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर इथे घडला आहे . गावातील एका महिलेवर ह्या आरोपीने बलात्कार केला होता आणि त्यानंतर तो तब्बल सात वर्षे पोलिसांना गुंगारा देत होता मात्र कोरोनाच्या भीतीने गावी आला आणि धरला गेला.

पांडुरंग य‌शवंत शेंगाळ (वय ५२) असं आरोपीचं नाव असून तो संगमनेर तालुक्यातील आहे. २०१३ मध्ये गावातील महिलेवर बलात्कार करून पळून गेला होता . अर्थात पोलीस त्याच्या मागावर होतेच मात्र तो काही पोलिसांच्या हाती लागत नव्हता. कोरोनामुळे मात्र त्याला बाहेर असुरक्षित वाटायला लागले आणि त्याने गावची वाट धरली मात्र गावी परतताच त्याला धरण्यात आले. जिथे पण जाईल तिथे तो आपली ओळख लपवून राहत होता त्यामुळे त्याचा शोध घेणे अवघड होत होत होते. गावी आल्यावर देखील त्याने आपली ओळख लपवूनच ठेवली होती मात्र स्थानिक सूत्रे मजबूत असल्याने पोलिसांना त्याला धरण्यात यश आले आहे .

संगमनेर तालुक्यातील शेंगाळवाडी परिसरातील डोंगराळ भागात तो खरं नाव आणि ओळख लपवून राहत होता मात्र तो गावी परतल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकानं डोंगराळ भागात जाऊन त्याला पकडले. ग्रामस्थांच्या मदतीनं त्याची ओळख पटविण्यात आली. पुढील कारवाईसाठी त्याला घारगा‌व पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. सात वर्षे तो कोणत्या शहरात लपून बसला होता तसेच त्याला कोणी कोणी मदत केली याचाही तपास आता करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

लॉकडाऊनदरम्यान सर्रास सुरु होते मसाज पार्लर,पोलिसी कारवाईत आठजण रंगेहाथ धरले : कुठली बातमी ?
https://nagarchaufer.com/?p=56

मोलकरणीशी अनैतिक संबंधाकरिता आईवडील बहीण आणि बायकोलाही संपवले : कुठे घडला प्रकार ?
https://nagarchaufer.com/?p=51

महिला मित्रासोबत रंगेहाथ धरले जाऊ नये म्हणून बाल्कनीतून मारली उडी : भाजपच्या नेत्याचा प्रताप
https://nagarchaufer.com/?p=89

लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या विवाहितेची ‘ ह्या ‘ कारणावरून प्रियकराने केली गळा आवळून हत्या : महाराष्ट्रातील बातमी
https://nagarchaufer.com/?p=128

फक्त इनर वेअर घालून कोरोनाच्या उपचारात गुंतलेल्या एका नर्सचा फोटो तुम्हाला आलाय काय ? : सत्यपरिस्थिती काय ?
https://nagarchaufer.com/?p=131

लॉकडाऊनमुळे भावी पतीचा विरह सहन होत नसल्याने नवरीने पायी गाठले भावी पतीचे घर : पुढे काय झाले ?
https://nagarchaufer.com/?p=80


शेअर करा