अण्णा लष्करे खून प्रकरणात अखेर पाच जणांना जन्मठेप , काय आहे प्रकरण ?

शेअर करा

नगर जिल्ह्यात अकरा वर्षांपूर्वी गाजलेल्या नेवासा येथील शिवसेनेचे पदाधिकारी असलेले अण्णा लष्करे यांच्या हत्येप्रकरणी पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे तर एका व्यक्तीची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिलेला असून एका व्यक्तीची सबळ पुराव्याच्या अभावी मुक्तता करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सय्यद सरफराज अब्दुल कादर, शेख एजाज उर्फ मुन्ना जहागीरदार, शेख जावेद शेख शेरू शेख, मुनीर उर्फ मुन्ना निजाम पठाण व शेख राजू उर्फ राजू जहागीरदार यांची जन्मठेप कायम करण्यात आलेली आहे तर शेख मुस्तफा अहमद शेख गुलाम रसूल याची सबळ पुराव्याच्या अभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील प्रशांत बोराडे यांनी याप्रकरणी न्यायालयात युक्तिवाद केलेला होता.

छत्रपती संभाजीनगर येथील नगर नाक्याजवळ 18 मे 2011 रोजी हा प्रकार घडलेला होता. नेवासा येथील शिवसेनेचे पदाधिकारी अण्णा लष्करे उर्फ सुनील लष्करे हे त्यांची पत्नी पूजा, मुलगी प्रिया , वैष्णवी आणि लहान मुलगा यांच्यासोबत आणि शेजारी राहणारा मुलगा मनोज धोत्रे याच्यासोबत नेवासा येथून औरंगाबादला खरेदीसाठी चाललेले होते. त्यांच्या कारचा पाठलाग करत आरोपी त्यांच्या मागावर होते तसेच घटना घडण्याआधी आरोपी मुन्ना जहागीरदार आणि मुनीर पठाण यांनी अण्णा लष्करे यांच्यासोबत एका फाट्यावरील पेट्रोल पंपावर भांडण देखील केलेले होते.

नगर नाक्यावर अण्णा लष्करे यांची गाडी आली त्यावेळी एका नॅनो कारने त्यांना धडक दिली आणि त्यांनी जाब विचारण्यासाठी कार थांबवली त्यावेळी दोन दुचाकीवरून सहा जण आले आणि त्यांनी अण्णा लष्करे यांचे हात धरले आणि तीन जणांनी गोळ्या झाडल्या. त्यांची पत्नी पूजा यांनी विरोध केला त्यावेळी त्यांचा मोबाईल खाली पडला आणि गोळ्या झाडल्यानंतर सर्व आरोपी फरार झालेले होते. सदर घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात त्यावेळी मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती .


शेअर करा