नवरा निघाला ‘ तसला ‘ मग सासरचे म्हणायला लागले की आता जर ?

शेअर करा

तब्बल ३० लाख रुपये खर्च करून तरुणीने लग्न तर केले मात्र हनिमूनला गेल्यानंतर लगेचच तिचा अपेक्षाभंग झाला मात्र त्यानंतर देखील पतीकडून त्रास देणे सुरु असल्याने उत्तर प्रदेशातील आग्राच्या महिला पोलीस ठाण्यात एका महिलेने हुंड्यासाठी छळ, मारहाण, फसवणूक आणि इतर कलमांबद्दल आपल्या पतीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पत्नी हनिमूनला गेली तेव्हा पतीने स्वत: समलिंगी असल्याचे आणि गंभीर आजाराने ग्रासलेला असल्याचे तिला सांगितले. एवढेच नाही तर त्याने तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. हुंड्यासाठी सासरच्यांनी तिला त्रास दिला असल्याचे देखील पीडितेच्या म्हणणे आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीडित तरुणीचे लग्न अलीगढ़ रोड, हाथरस निवासी येथील रहिवासी असलेल्या युवकाशी मे 2019 रोजी झाले होते. तो तरुण डॉक्टर आहे. तिने लग्नात 30 लाख रुपये खर्च केले होते तरीदेखील सासरचे लोकसुद्धा या लग्नावर खुश नव्हते. लग्नानंतर ते तिला टोमणे मारायचे. दोन दिवसांनंतर पती कुल्लू मनालीला हनीमूनला घेऊन गेला.

हनिमूनला गेल्यानंतर हॉटेलमध्ये नवऱ्याने तिला मारहाण केली तसेच चालत असताना डोंगरावरून ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र ती वाचली. हॉटेलमध्ये आल्यानंतरही धमकी दिली. धमकी देताना नवरा म्हणाला की, तो समलैंगिक आहे. बायकोने तिला फसवले असे म्हणताच त्याने मारहाण केली, मोबाइल तोडला आणि गळा दाबण्याचा प्रयत्न केला. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तिची सुटका केली आणि पोलिसांना कळवले.

पोलिसांनी पतीशीही चर्चा केली. त्यावेळी हे प्रकरण शांत झाले. यानंतर हे दोघेही हनिमूनहून परत आले. तिचा सासरा आल्यानंतर मुलगी आपल्या माहेरी गेली. ऑगस्ट 2019 मध्ये सासरच्यांनी घरी येऊन जर तुमच्या मुलीला नांदवयाचे असेल तर दहा लाख रुपयांची मागणी केली त्यानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार दिली. कौटुंबिक समुपदेशन केंद्रात काही मार्ग न निघाल्याने पीडित महिलेने 11 सप्टेंबर रोजी पतीविरूद्ध महिला पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. यात तिने तिच्या पतीवर फसवणूक, हुंड्यासाठी त्रास, मारहाण, अत्याचार, जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.


शेअर करा