सीमा हैदरने अखेर कुणाला बांधली राखी ? , व्हिडिओही झाला व्हायरल

शेअर करा

सोशल मीडियामध्ये सध्या सीमा हैदर आणि सचिन मीना यांची जोरदार चर्चा सुरू असून रक्षाबंधनच्या मुहूर्तावर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्यासोबत इतर भाजपच्या नेत्यांना रक्षाबंधनासाठी राख्या पाठवलेल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर भाजपच्या नेत्यांना प्रत्यक्ष भेटून रक्षाबंधन साजरे करणे शक्य नसल्याने सीमा हैदर हिने तिचे वकील एपी सिंह यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केलेले आहे. तिच्या या रक्षाबंधनाचा व्हिडिओ सोशल मीडियात सध्या जोरदार चर्चेत आहे.

पाकिस्तानमधून भारतात आल्यानंतर सीमा हैदर उर्फ सीमा मीना ही सोशल मीडिया सेलिब्रिटी झालेली असून ऑनलाईन गेम खेळताना ती नोएडा येथील सचिन मीना नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडलेली होती. विवाहित असलेली सीमा हीने पाकिस्तान इथून चार मुलांना घेऊन पलायन केले आणि भारतात दाखल झाली . तिची प्रेमकहाणी समोर आल्यानंतर देशात देखील या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली.

सीमा आणि सचिन यांच्या प्रेमप्रकरणावर सध्या कराची टू नोएडा हा चित्रपट निघणार असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर देखील समोर आलेले आहे . सदर प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणात अनेक वेळा भेटी दिल्या आणि त्यातून त्यांचे प्रेमकहानी कशी आहे या चर्चा बाहेर आल्या. अमित जानी नावाच्या एका व्यक्तीला ही कहाणी आवडली आणि त्यांनी यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

कराची टू नोएडा या चित्रपटाचे पोस्टर देखील सध्या रिलीज झालेले असून पहिले गाणे 20 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाले आहे . ‘ चल पडे है हम ‘ नावाने हे गाणे आहे .अमित जानी हे या चित्रपटाची निर्मिती करणार असून भरत सिंह नावाच्या एका व्यक्तीवर त्याच्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे . फरहीन फलक नावाची एक अभिनेत्री यामध्ये सीमा हिचा रोल करणार असून सोशल मीडियावर पहिले पोस्टर रिलीज करून या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे.


शेअर करा