‘ खाजगी ‘ आयुष्यात नको तितके डोकावण्याची तिने फॅमिली फ्रेंडला दिली संधी मात्र झाले असे की ?

शेअर करा

सोशल मीडियाच्या माध्यमातून तो तिच्या संपर्कात आला होता मात्र अखेर त्याने तिचे आयुष्यच उद्धवस्त केले. सोशल मीडियावर आपले बरेच फ्रेंड असतात. त्यातील बहुतेकांना आपण प्रत्यक्ष ओळखतही नसतो. आपल्या आयुष्यातील बहुतांश गोष्टी आपण त्यांच्याशी शेअर करतो. त्यांना अगदी आपल्या आयुष्यात डोकावण्याची संधी देतो आणि असंच करणं एका उच्चभ्रू समाजातील महिला डॉक्टरला अत्यंत महागात पडलं आहे. तिचा फेसबुक फ्रेंड काही काळाने तिचा फॅमिली फ्रेंड झाला आणि आता तिचं आयुष्यच त्याने उद्धवस्त केलं आहे.घटना उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधली आहे . ( Blackmailed the female doctor by stealing and editing the photo from the mobile )

उपलब्ध माहितीनुसार, सदर तरुणाची आणि महिला डॉक्टरची ओळख फेसबुकवर झाली. त्या दोघांमधील जवळीक इतकी वाढली की तो फक्त तिचा फेसबुक फ्रेंड राहिला नाही तर फॅमिली फ्रेंडही झाला. यादरम्यान तो तिच्याकडून वेळोवेळी पैसे देखील मागू लागला. कोणत्या ना कोणत्या कारणाने तिच्याकडून तो मोबाइल देखील घ्यायचा. त्याची ही जवळीक महिलेच्या कुटुंबाला खटकायला लागली आणि तिने त्याच्याशी संबंध तोडून टाकले मात्र यानंतर तरुणाने महिलेला धमकी द्यायला सुरुवात केली.

मात्र याआधी सदर महिलेचा मोबाईल हा आरोपी कित्येक वेळा घेत होता त्यामुळे तरुणाने महिलेच्या मोबाईलमधून तिचे काही पर्सनल फोटो आपल्या जवळ सेव्ह करून ठेवले होते . फोटो त्याने फोटोशॉपमध्ये एडिट केले. बदल केलेले असे अश्लील फोटो सार्वजनिक करण्याची धमकी महिलेला दिली. महिलेनं याचा विरोध केल्यानंतर त्याने फेसबुकवर एक फेक अकाऊंट तयार करून हे अश्लील फोटो टाकले. इतक्यावरच तो थांबला नाही तर मेसेंजरमधून त्याने सर्वांना फोटो पाहण्यासाठीही निमंत्रण दिले.

पीडित महिला ही गाझियाबादमधली असून तरुण हा जम्मू मध्ये राहतो. गेल्या चार-पाच वर्षांपासून हा तरुण आपल्याला सतत धमकी देत आहे, असा आरोप महिलेनं केला आहे. तिला आणि तिच्या पतीला बदनाम करण्याची धमकी देऊन पैसे मागत आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.लाइव्ह हिंदुस्तानच्या रिपोर्टनुसार महिलेनं आपण जम्मूत राहणाऱ्या तरुणाला गेल्या आठ वर्षांपासून ओळखत असल्याचं सांगितलं.


शेअर करा