पुण्यात खळबळ..शहरातील प्रसिद्ध उद्योजक ‘ सुसाईड नोट ‘ लिहून झाले बेपत्ता .. काय लिहले आहे चिठ्ठीत ?

शेअर करा

अचानक कोणतेही प्लॅनिंग न करता लादलेली नोटबंदी आणि त्यानंतर अचानकपणे लागू केलेला जीएसटी यांनी देशातील उद्योगाचे आणि उद्योजकांचे कधी न भरून येणारे नुकसान केले. लाखो उद्योजक यामुळे देशोधडीला लागले. अशातच पुण्यातील प्रसिद्ध पाषाणकर उद्योगसमूहाचे प्रमुख गौतम पाषाणकर बुधवारी बेपत्ता झाले. ते बेपत्ता झाल्यानंतर पूर्ण पुणे शहरात यामुळे एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शोध सुरू केला असता तपासादरम्यान गौतम पाषाणकर यांची आत्महत्यासंदर्भात एक चिठ्ठी लिफाफ्यात सापडली आहे, यामध्ये व्यवसायातील आर्थिक नुकसान यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. Famous Pune businessman Gautam Pashankar goes missing after writing suicide note

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम पाषाणकर हे पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आहेत तसेच बांधकाम व्यावसायिक देखील आहेत. ते बुधवारी नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर पडले आणि लोणी काळभोर येथील गॅस एजन्सीच्या ऑफिस मध्ये गेले तेथून शिवाजीनगर येथील ऑफिसमध्ये आल्यावर एक बंद लिफाफा त्यांनी चालकाकडे दिला आणि तो घरी देण्यास सांगितले. चालक लिफाफा देण्यासाठी घरी गेला त्यानंतर पाषाणकर ऑफिसमधून बाहेर पडले आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिशेने चालत निघून गेले. ते घरी न आल्याने कुटुंबीयांनी अखेर पोलिसात धाव घेतली आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदविण्यात आली.

तपास सुरू असताना चालकाकडे दिलेल्या लिफाफ्यात आत्महत्या संदर्भातली चिठ्ठी आढळली. काही दिवसापासून व्यवसायात झालेल्या नुकसान यामुळे आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत असून याकरिता कोणालाही जबाबदार ठरू नये असे लिहिलेले आहे. पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला असून विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

गौतम पाषाणकर यांचे पुत्र कपिल पाषाणकर काय म्हणाले ?

” वडिलांना कोणत्या व्यवसायात एवढं आर्थिकदृष्ट्या अपयश आलंय हेच कळायला आम्हाला मार्ग नाही. खिशात जेव्हा पैसे नाहीत तेव्हा असं काही घडलं तर ठीक पण पैसे नाहीत असंही काही नाही. थोडा मानसिक तणावामुळे ते कदाचित बाहेर पडले आहेत आणि नक्कीच कुठेतरी असून पुन्हा परत घरी येतील . आम्हाला पाच वर्षापूर्वीच व्यवसायात आर्थिक नुकसान सहन करावे लागले, आता नवीन असे काहीच नाही. आज बँकेची जी देणी आहेत त्या तुलनेत आमची मालमत्ता दुप्पट आहे. ज्यावेळी जनरल मोटर्स ही कंपनी भारतातून बाहेर पडली त्यावेळी आमच्या ऑटोमोबाइल व्यवसायाला जवळपास शंभर कोटी रुपयांचे नुकसान झाले त्यावेळी आमच्याकडे आठशे कर्मचारी काम करत होते.

तीनशे कोटी रुपयांची आमची उलाढाल होती त्यामुळे यापूर्वी देखील आम्ही अपयश पाहिलेले आहे तरी कधी कोणी खचुन गेले नाही. आम्ही हळूहळू त्यातून बाहेर पडलो. जुन्या बँकांची 130 कोटींची कर्जे आम्ही फेडली त्यानंतर नवीन बँकांकडून देखील आठ ते दहा कोटी रुपयांचे कर्ज मिळाले आता सर्व व्यवस्थित सुरू आहे.

माझ्या बहिणीची वडिलांना काळजी वाटत असे. माझी बहीण त्यांचा वीकपॉईंट आहे. त्यांचा केवळ खाजगी पुरवठादार असलेल्यांशीच आर्थिकदृष्ट्या मानसिक ताण तणाव व्यवहार होता आणि ज्या कंपनीशी हा व्यवहार होता त्याची संचालक माझी बहीण होती. त्या कंपनीला त्यांनी पैसेही दिले पण तरी त्यांना भीती वाटायची त्यामुळे ते अस्वस्थ असायचे. सध्या तरी हेच त्यांच्या मानसिक ताण तणावाचे कारण असावे असे आम्हाला वाटते पण ते नक्कीच परत येतील अशी आशा देखील आम्हाला आहे. ”


शेअर करा