‘ नाझींप्रमाणेच राममंदिरासाठी पैसे न देणाऱ्या लोकांच्या घरावर आरएसएस खुणा करतंय ‘: कोणी केला आरोप ?

  • by

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी आरएसएसवर अयोध्येतील राम मंदिरासाठी देणगी न देणाऱ्यांची घरे चिन्हांकित केल्याचा आरोप केला आहे आणि जर्मनीत नाझींनी केले त्याप्रमाणेच हा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. आरएसएसने हे आरोप फेटाळून लावले आहेत आणि “कुमारस्वामी यांच्या टिप्पण्या कोणत्याही प्रतिसादासाठी पात्र नाहीत.” असे म्हटले आहे .कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी ट्वीटच्या मालिकेत असा दावा केला आहे की ‘ जर्मनीत नाझी पार्टीची स्थापना झाली त्याच काळापासून आरएसएसचा जन्म भारतात झाला होता’ .

ट्विटमध्ये कुमारस्वामी म्हणतात, “असे दिसते की राममंदिराच्या उभारणीसाठी देणगी गोळा करणारे ज्यांनी पैसे दिले आणि ज्यांच्याकडून पैसे मिळाले नाहीत त्यांच्या घरांना स्वतंत्रपणे चिन्हांकित केले गेले आहे. हिटलरच्या कारकिर्दीत जेव्हा नाझींनी जर्मनीत केले त्याप्रमाणेच जेव्हा लाखो लोकांचा जीव गेला. या घडामोडींमुळे देशाला कोठे नेले जाईल ‘ याबद्दल देखील त्यांनी इतर ट्विटमध्ये चिंता व्यक्त केली आहे.

इतिहासकारांचा हवाला देत कुमारस्वामी यांनी दावा केला की, ‘ जर्मनीत जेव्हा नाझी पार्टीची स्थापना झाली त्याच वेळी आरएसएसचा जन्म झाला. जर आरएसएसने नाझींनी अवलंबलेली अशीच धोरणे राबविण्याचा प्रयत्न केला तर काय होईल याची चिंता आहे. लोकांची मुलभूत हक्क हिसकावून घेतली जात आहेत. देशात अघोषित आणीबाणी आहे कारण लोक मुक्तपणे आपले मत व्यक्त करू शकत नाहीत. ‘