.. अन एकाच झटक्यात ‘ त्या ‘ ३०-३५ महिलांचे भूत उतरले, जिल्ह्यात उडाली होती खळबळ

  • by

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर इथे तीन हजार लोकवस्तीच्या गावामध्ये काही दिवसांपुर्वी पारधी समाजातील सुमारे ३० ते ३५ महिला व पुरुषांच्या अंगात एकाच वेळी भूत संचारल्याच्या घटनेची वार्ता सर्वदुर पसरली होती. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले होते. तेथील स्थानिक मांत्रिकाने या सर्वांना भुताने झपाटलेले आहे अशी अफवा परिसरात निर्माण केल्याने संपूर्ण गाव दहशतीत होते मात्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीने गावात मार्गदर्शन व प्रबोधनाचा अँटीव्हायरस फवारल्यानंतर ३० ते ३५ नागरीकांची भुतबाधा झटपट उतरल्याची माहिती समोर आली आहे.

मंगरुळ चव्हाळाचे ठाणेदार व त्यांच्या संपूर्ण ताफा तसेच श्रीकृष्ण धोटे, प्रवीण गुल्हाणे, मतीन भोसले, ओंकार पवार या गावाती पोहचले. त्याठिकाणी एक सार्वजनिक कार्यक्रम मंदिराच्या परिसरात घेण्यात आला. याप्रसंगी मतीन भोसले यांनी कार्यक्रमाचे महत्व विषद केले. त्यानंतर ठाणेदार पडघन यांनी गावातील वातावरण शांत व सलोख्याचे ठेवण्याकरिता अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते.

अंनिसच्या कार्याची माहिती देत श्रीकृष्ण धोटे यांनी ग्रामस्थांना आपल्या चमत्काराच्या नादात कसे फसले जातो यांची प्रात्यक्षीक करुन माहिती दिली. स्वत:ला भगत म्हणणारे गजानन भोसले व त्याचे वडिलांनी सोने मिळवून देतो असे आमिष देऊन काही लोकांना आपल्या जाळ्यात अडकवले. त्याचबरोबर ज्या लोकांना ही बातमी मिळू लागली त्यांनी देखील भुताची बाधा झाल्याचे सोंग सुरु केले. त्यामुळे ही संख्या वाढत जाऊन ३५ पर्यंत पोहोचली होती.

काय होता प्रकार ?

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील एका गावाला भुताने झपाटल्याची अफवा पसरवण्यात आली होती. या गावातील 30 ते 35 महिलांच्या अंगात एकाच वेळी येत असल्याने गावात भीतीचं वातावरण पसरलं होत . अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवरा गावात हा विचित्र प्रकार घडला होता. शिवरा गावातील पारधी समाजातील 30 ते 35 महिलांच्या अंगात एकाच वेळी देवी संचारल्याने गावात भीतीचं वातावरण पसरलं होत.

गावातील अनेक महिला आणि तरुण मुलींच्या अंगात येवू लागलं होत, असं स्थानिक मांत्रिकाने सांगितल्याने नागरिक देखील गडबडून गेले होते. मांत्रिक अंधश्रद्धेच्या प्रभावाखाली येऊन भूत उतरण्याच्या नावाखाली संबंधित महिला आणि तरुणींना अमानुष मारहाण करत असल्याची देखील माहिती होती . पारधी समाजातील कार्यकर्ते मतीन भोसले यांना कळल्यानंतर या घटनेला वाचा फुटली .

मतीन भोसले यांनी या घटनेची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिली आणि त्यानंतर डॉ हमीद दाभोलकर, मतीन भोसले यांनी संबंधित लोकांचं समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला.सुरुवातीला लोकांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही आणि लोकांनी भूत उतरवण्यासाठी दुसऱ्या दिवशी विठोबा सावंगी हे ठिकाण गाठले होते. मात्र तिथे भ्रमनिरास झाल्यानंतर अखेर वैज्ञानिक दृष्टिकोन समजून सांगितल्यावर आपली कशी फसगत झाली हे त्यांच्या ध्यानात आले आणि झटपट अंगातले भूत गायब झाले.