लग्नात सामील होऊन वरातीत नाचला कोरोनाबाधित तरूण,अनेकांना लागण अन गाव सील

शेअर करा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात अक्षरशः थैमान घातलं आहे. रुग्णालयापासून स्माशानभूमीपर्यंत सगळीकडेच रांगा लागल्याचं भयंकर चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, परिस्थिती इतकी गंभीर असतानाही काही लोक मात्र हलगर्जीपणा करत असल्याचं समोर येत आहे. अशीच आणखी एक घटना आता मध्य प्रदेशात समोर आली आहे. या घटनेत एका व्यक्तीच्या चुकीची किंमत संपूर्ण गावाला चुकवावी लागली आहे.

मध्य प्रदेशच्या निवाडी जिल्ह्यातील लुहरगुना गावातील एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह आला. मात्र त्यानं ही गोष्ट आठ दिवस सगळ्यांपासून लपवली. इतकंच नव्हे तर गावातील एका लग्नात सहभागी होत तो संपूर्ण गावभर फिरतही राहिला. या तरुणामुळे आता गावातील जवळपास 40 लोकांना कोरोनाची लागण झाली आणि यातील अनेकजण सध्या गंभीर असल्याचे देखील वृत्त समोर आले आहे

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनानं संपूर्ण गाव रेड झोन घोषित करत सील केलं. आता गावात येण्यास आणि गावातून बाहेर जाण्यास बंदी आहे. गावात पोलीस बंदोबस्तही करण्यात आला असून लोकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. डॉक्टरांचा एक गट गावातील प्रत्येक घरात जाणून लोकांच्या आरोग्याविषयी माहिती घेत आहे. पोलिसांनी कोरोनाचा प्रसार करणाऱ्या युवकासह विनापरवानगी लग्न करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल केला आहे.

लुहरगुवा गावातील एका 24 वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल 27 एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. मात्र, तरीही युवकानं स्वतःला क्वारंटाइन केलं नाही. तरुणानं याबद्दल कोणालाही माहिती दिली नाही. तो यानंतर केवळ गावातच फिरला नाही तर एका लग्न समारंभातही सहभागी झाला. या समारंभात त्यानं लोकांना जेवणंही वाढलं. याशिवाय दुसऱ्या दिवशी तो वरातीमध्येही सहभागी झाला. वरातीत त्यानं बराच वेळ डान्स केला. लग्नाच्या स्टेजवर जाऊन त्यानं नवरदेव-नवरीसोबत फोटोही काढले. लग्नाहून परतल्यानंतर तो पुन्हा गावात फिरत राहिला.


शेअर करा