पुणेकरांसाठी महापौरांनी दिली मोठी गुड न्यूज..काय आहे नवीन नियमावली ?

शेअर करा

पुण्यात गेल्या दोन महिन्यांपासून कठोर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर आज गेल्या 24 तासात अवघे 180 रुग्ण समोर आले आहेत. दुसऱ्या लाटेतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. दरम्यान पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम म्हणूनच रूग्णसंख्या कमी झाली अशी भावना पुण्याच्या महापौरांनी व्यक्त केली आहे. पुणेकरांचे आभार देखील त्यांनी व्यक्त केले .

काल पुण्यात गेल्या तीन महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या नोंदविण्यात आली होती. दुसऱ्याच दिवशी पुण्यातून आणखी एक चांगली बातमी समोर आली आहे. गेल्या 24 तासात पुण्यातून अवघे 180 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. आज दिवसभरात पुण्यात 4439 चाचण्या करण्यात आल्या. त्यातून केवळ 180 जणांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे .पुणे शहरातील लॉकडाऊनला 60 दिवस झाले असून कोरोनाही आटोक्यात आला आहे. आता पुन्हा अनलॉकच्या दिशेने जात आहे.

काय आहे नवीन नियमावली ?

  • पुण्यात सकाळी 7 ते 2 पर्यंत सर्वप्रकारची दुकाने सोमवार ते शुक्रवार सुरू राहणार आहेत.
  • शनिवार, रविवारी माञ फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहिल
  • उद्याने, हॉटेल बंद राहणार, फक्त पार्सल सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहिल
  • पुढच्या काही दिवसांसाठी ही शिथिलता असेल, नंतर पुन्हा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल
  • शासकीय कार्यालये 25 टक्के उपस्थितीत सुरू राहणार
  • मद्यविक्रीची दुकाने सातही दिवस सुरू राहणार
  • शॉपिंग कॉम्पलेक्स बंदच राहणार
  • पुण्यातील पावसाळी पूर्व कामं सुरूच आहेत, वेळेत लवकर पूर्ण करू
  • लग्न, समारंभ, मेळावे बंदच असतील

शेअर करा