मुलगा बाहेर गेल्याची वडिलांनी वेळ साधली आणि पुढे घडली ‘ धक्कादायक ‘ घटना : महाराष्ट्रातील बातमी

शेअर करा

चित्र: प्रतीकात्मक

कोरोनाबद्दल सातत्याने भीती दाखवणाऱ्या कोरोना कॉलरट्यून व इतर प्रसारमाध्यमांकडून देखील सातत्याने कोरोनाबद्दल दाखवली जात असलेली भीती आणि सातत्याने होणारे नकारात्मक वार्तांकन यामुळे कोरोना रुग्ण व इतरही लोकांमध्ये नैराश्य पसरलेले आहे . याच नैराश्यातून याआधी देखील आत्महत्या घडल्या आहेत मात्र सोमवारी पुण्यात एका ५५ वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुंडाप्पा शरणाप्पा शेवरे (वय ५५, रा. अप्पर इंदिरानगर) असे या रुग्णाचे नाव आहे .

कोंढवा येथील सिंहगड गर्ल्स होस्टेलमधील विलगीकरण केंद्रामध्ये सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गुंडाप्पा यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना ४ जुलै रोजी महापालिकेच्या कोंढवा येथील विलगीकरण केंद्रामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचा मुलगाही पॉझिटिव्ह असल्याने तोही त्यांच्यासोबत दाखल झाला होता. ते दोघे आणि आणखी दोन रुग्ण असे चौघे जण एका खोलीत उपचार घेत होते, अशी माहिती कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर लगेचच आणखी एका रुग्णाचा देखील हृदयविकाराने मृत्यू झाला.

सोमवारी सकाळी शेवरे यांचा मुलगा व इतर दोन रुग्ण नाश्ता करण्यासाठी गेले असताना गुंडाप्पा यांनी आतून दार लावून घेतले. कपडे अडकविण्याच्या खुंटीला पांढऱ्या दुप्पट्याने गळफास घेऊन आयुष्य संपवले. त्यांचा मुलगा व इतर रुग्ण परत आल्यावर खोलीचा दरवाजा त्यांना बंद दिसला. दरवाजा ढकलून उघडला असता गुंडाप्पा यांनी गळफास घेतलेला पाहून त्यांना धक्काच बसला . मागील दोन दिवसांपासून गुंडाप्पा यांचा खोकल्याचा त्रास वाढला होता. यामुळे ते थोडे त्रस्त होते. त्यातूनच त्यांनी गळफास घेतल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.


शेअर करा