नगरची बातमी: ‘ सही दे सही ‘ तो म्हणाला आठ हजार दे मग देतो, मग काय …

शेअर करा

ठेकेदाराचे रस्ता दुरुस्तीचे बिल काढून त्यावर सही करण्यासाठी पाथर्डी पंचायत समिती मधील बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. रामभाऊ दुधाराम राठोड असे लाच घेतलेल्या शाखा अभियंत्याचे नाव आहे.

पाथर्डी तालुक्यातील कामत शिंगवे येथे रस्ता दुरुस्तीचे काम तक्रारदार ठेकेदाराने घेतले होते. काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे चार लाख रुपयांचे बिल मंजूर करिता जिल्हा परिषदेकडे पाठवण्यासाठी व कामाच्या रेकॉर्डवर सही करण्यासाठी शाखा अभियंता राठोड याने ठेकेदाराकडे रकमेच्या दोन टक्केप्रमाणे आठ हजार रुपये मागितले. त्यात तडजोड होऊन पाच हजार रुपये देण्याचे ठरले मात्र सदर ठेकेदाराने 28 जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली.

29 जुलै रोजी पथकाने पाथर्डी पंचायत समितीत सापळा लावला आणि संबंधित शाखा अभियंत्यास पाच हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलीस उपाधीक्षक हरीश खेडकर, निरीक्षक शाम पावरे, दीपक करांडे, पोलीस नाईक रमेश चौधरी, रवी निमसे, वैभव पांढरे, संध्या म्हसे, राधा खेमनर आदींनी ही कारवाई केली.


शेअर करा