पुणेकराची कमाल .. ‘ चक्क ‘ ह्या कारणासाठी चोरल्या कोंबड्या

शेअर करा

कोंबडी हा जीव बिचारा लोकांच्या जीवाचे चोचले पुरवण्यासाठीच जन्माला आलाय काय ? अस तमाम कोंबड्याना वाटत असेलच. आखाडी साजरी करण्यासाठी एकानं थेट कोंबड्यांचीच चोरी केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे .हडपसर हिंगणेमळा येथे हाजी चिकन शॉप शेजारील एका पिंजऱ्याचे कुलूप तोडून तब्बल वीस गावरान कोंबड्या चोरून चोर पसार झाला मात्र ह्या प्रकाराची परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे. रविवारी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास हिंगणेमळा याठिकाणी ही घटना घडली आहे. शॉप मालक अस्लम इस्माईल शेख यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आज रविवार असल्याने चांगला व्यवसाय होईल या आशेने त्यांनी गावरान कोंबड्या विक्रीसाठी कालच पिंजऱ्यात आणून ठेवल्या होत्या. मात्र सकाळी दुकान उघडले आणि शेजारील पिंजऱ्यात पाहिले तर कोणी तरी पिंजऱ्याचे कुलूप तोडून आत मधून कोंबड्या चोरल्याचे समजले. रविवारी चिकनसाठी लोकांची गर्दी असते मात्र कोंबड्याच चोरीला गेल्यानं ग्राहकांना काय उत्तर द्यायचं ? याची शॉप मालक अस्लम इस्माईल शेख यांना चिंता पडली होती.

दुकाना शेजारील योगेश हिंगणे यांनी याबाबत दुकानाच्या समोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात पाहिले असता तीन अज्ञात इसम गाडीवरून येऊन कुलूप तोडून पोत्यामध्ये कोंबड्या भरून हडपसरच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याचे दिसल्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यात पाचशे रुपयाच्या वीस कोंबड्या चोरीला गेल्याची तक्रार शॉपचालक यांनी दिली असून ‘ माझी गरिबी परिस्थिती आहे, कोंबड्याचा शोध घेऊन मला द्यावेत, अशी विनंती मालक अस्लम शेख यांनी तक्रारी अर्जातून केली आहे.


शेअर करा