इंदुरीकर महाराज म्हणाले ‘ कोरोनाची तिसरी लाट ही.. ‘

शेअर करा

प्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांनी कोरोना ह्या विषयावर बोलताना पुन्हा एक वक्तव्य केलं असून त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झालेली आहे . लातूरमध्ये आयोजित कीर्तनात महाराजांनी तिसऱ्या लाटेबाबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले असून त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा पुन्हा सुरु झाली आहे .

लातूरमध्ये आयोजित कीर्तनात बोलताना ह.भ.प. इंदुरीकर महाराज म्हणाले की, ‘ कोरोनाचा प्रकोप जगभरात पाहायला मिळतोय. आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटा येवून गेल्या. यात अनेकांना आपल्या प्राणास मुकावं लागलं. आता आपण सर्वचजण तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहोत. तुम्ही-आम्ही भाग्यवान आहोत. कारण आपण दुसऱ्या लाटेतून वाचलो आहोत. तुमचा आणि आमचा जन्म नाही, तर पुनर्जन्मच आहे. मला कोरोना झाला नाही, कारण मी माळकरी आहे. आता तिसरी लाट माळा काढणाऱ्यांसाठीच ‘

एका भाविकास उद्देशून ते म्हणाले, ‘ कीर्तनात उत्साहानं बसायला हवं. कोरोना पॉझिटिव्ह असल्यासारखं वागू नये. दोन लाटांतही आपण जिवंत आहोत, हे आपलं भाग्य आहे. हा आपला जन्म नसून पूनर्जन्म आहे ‘ . महाराजांच्या या वाक्यावर किर्तनाला जमलेल्यांनी जोरजोरात हसायला सुरुवात केली. याआधी आपण लस घेणार नसल्याचं विधान इंदुरीकर महाराजांनी केलं होतं.

त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराजांना किर्तनातून जनजागृती करण्याचं सूचवलं होत त्यानंतर महाराजांनीही आपण जगजागृती करण्याचे आश्वासन टोपेंना दिलं होत आणि त्याचा श्रीगणेशाही इंदुरीकर महाराजांनी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथून केला होता.


शेअर करा