आज पुन्हा अच्छे दिन ? , पेट्रोल डिझेलच्या किमतीत झाली तब्बल ‘ इतकी ‘ वाढ

शेअर करा

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलची किंमत जरी 100 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली असली तरी भारतीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमतींच्या दरवाढीचं सत्र मात्र काही करुन थांबण्याचं नाव घेईना. देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये दररोज वाढ होत असल्याचं दिसत आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे.

दोन आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत 13 वेळा वाढ झाली आहे.निवडणूक संपताच 22 मार्चपासून सुरू झालेलं वाढीचं सत्र आटोक्यात येण्याचं नाव घेत नाही. 15 दिवसांपैकी 24 मार्च आणि 1 एप्रिल हे दोनच दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल न झाल्यानं दर स्थिर होते. देशाची राजधानी दिल्लीमध्ये 2 आठवड्यात हळूहळू पेट्रोल 9.20 रुपयांनी महागलं आहे.

भारतीय तेल कंपन्यांनी 5 एप्रिल रोजी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-80 पैशांनी प्रतिलिटर वाढ केली आहे. भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या ताज्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरांत 84 पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरांत 85 पैसे प्रति लिटरची वाढ झाली आहे. दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल 119.67 रुपये प्रति लिटरवर, तर डिझेल 103.92 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. मुंबईतर गेल्या पंधरा दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरांत झालेली ही तेरावी वाढ आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती अपडेट करतात.


शेअर करा