भारतात अजून म्हणावी इतकी महागाई वाढलेली नाही ,भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे विधान

शेअर करा

देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती आणि गॅसच्या किमती वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जीने मुश्किल झालेले असताना आणि देशात महागाई 17 महिन्याच्या उच्च उच्चांकावर जाऊन पोचलेली असताना देखील भारतात अजून म्हणावी इतकी महागाई वाढलेली नाही असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलेले आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीमुळे सर्व वस्तूमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आहे. त्याचा परिणाम जगात सर्व अर्थव्यवस्थांवर होत आहे तरीदेखील त्या तुलनेत भारतात महागाई दर 6.9 टक्केच आहे. आमचा अंदाज चार टक्के होता त्यामुळे दोन टक्के पुढेमागे होण्याची शक्यता असते. भारतात महागाई सहा टक्क्यांच्या पुढे असली तरी ती खूप वाढलेली नाही, असे देखील मत निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले आहे

निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की, महागाईदर सहा टक्क्यांच्या पुढे जातो त्यावेळी त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो असे आरबीआयने या आधी म्हटलेले आहे. किमतींचा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर पडत असून सरकार या स्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे मात्र तरीदेखील आम्ही आमच्या आव्हानांना न जुमानता प्रणालीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत असे देखील त्या पुढे म्हणाल्या.


शेअर करा