मोदीजी ..लॉकडाऊन फेल आता पुढे काय ? राहुल गांधी यांचा पत्रकार परिषदेत मोदींना सवाल : पहा काय म्हणाले ?

शेअर करा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी ऑनलाईन पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर जबरदस्त हल्ला चढवला. मोदींनी घोषणा करून केलेले लॉकडाउन फेल झाल्याचा आरोप देखील राहुल गांधींनी केला आहे . राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले होते, की आपण 21 दिवसांत कोरोना व्हायरसवर मात करू, मात्र आता 60 दिवस झाले आहेत. आता तर देशभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. लॉकडाउनही काढला जात आहे. लॉकडाउनचा जो हेतू होता तो पूर्णपणे फेल ठरला आहे.

लॉकडाउनच्या चारही टप्प्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेले परिणाम मिळाले नाहीत. अशात, सरकारला विचारण्याची आमची इच्छा आहे, आता सरकार पुढे काय करणार ? कारण लॉकडाउन फेल ठरले आहे.आज संपूर्ण जग लॉकडाउन हटवत असताना तेथील कोरोना केसेसे कमी होत आहेत. मात्र, आपल्याकडे केस वाढत आहेत अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी काय करत आहेत ?

काँग्रेसचे सरकार असलेल्या राज्यांसंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले, आमचे सरकार गरिबांना पैसे आणि भोजन देत आहे. आम्हाला माहिती आहे, की पुढे काय करायला हवे. पण राज्ये किती काळ एकटेच लढाई लढतील. केंद्रालाही पुढे यावे लागेल आणि नियोजनासंदर्भात देशाशी बोलावे लागेल.

देशातील कोरोना बाधितांचा आकडा आता 1 लाख 45 हजारच्याही पुढे गेला आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी जारी केलेल्या माहितीनुसार, आता देशातील एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 45 हजार 380 झाली आहे. यापैकी 4 हजार 167 जणांचा मृत्यू झाला. तर 60 हजार हून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. मात्र देशात कोरोनाचा फैलाव सातत्याने वाढतच चालला आहे.सध्या देशातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 80 हजारहून अधिक आहे.

संबंधित बातम्या

” तेव्हा ” काळ्या चड्ड्या बनियन घालून आंदोलन केलं असत तर महाराष्ट्राने पाठ थोपटली असती : संजय राऊत
https://nagarchaufer.com/?p=59

भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या हातात ‘ फडणवीस हटाव ‘ चा फलक ? : जाणून घ्या काय आहे वस्तुस्थिती
https://nagarchaufer.com/?p=62

महिला मित्रासोबत रंगेहाथ धरले जाऊ नये म्हणून बाल्कनीतून मारली उडी : भाजपच्या नेत्याचा प्रताप
https://nagarchaufer.com/?p=89

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी घेतलाय योगी आदित्यनाथ यांचा चांगलाच समाचार : पहा काय म्हणाले ?
https://nagarchaufer.com/?p=154

आरती कीजै नरेन्द्र ललाकी म्हणत नरेंद्र मोदींची आरती झाली लाँच…काय आहेत आरतीचे बोल ?
https://nagarchaufer.com/?p=103

अंकल..तुम्ही आदराच्या लायकीचेच नाही, स्वरा भास्करच्या निशाण्यावर कोण ?
https://nagarchaufer.com/?p=123

लॉकडाऊनचे नियम फाट्यावर मारत भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार खेळले क्रिकेट : व्हिडीओ व्हायरल
https://nagarchaufer.com/?p=142


शेअर करा