एसबीआयच्या शाखेत बैल घुसल्याने योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका

शेअर करा

सध्या सोशल मीडियात उत्तर प्रदेशातील एका घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे . उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील बडा चौराहा इथे स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत एक बैल घुसला . शाखेच्या बाहेर बैलांमध्ये झुंज सुरू होती त्यातील एक दमला आणि विश्रांतीसाठी एसबीआय शाखेत शिरला . बँकेचे सुरक्षारक्षक गेटवर नव्हता त्यामुळे बँकेमध्ये येऊन काही काळ तो बसला आणि त्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले . 

 अचानकपणे बँकेत बैल आल्यानंतर ग्राहकांमध्ये गोंधळ उडाला आणि त्यांनी धावपळ सुरू केली. बैल बँकेच्या कॅशियर काउंटर पर्यंत पोहोचला त्यावेळी सुरक्षारक्षकाने मोठ्या प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढले . बँकेचे शाखा व्यवस्थापक गौरव सिंग यांनी त्यानंतर त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. 

 व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समाजवादी पार्टीने व्हिडिओ पोस्ट करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केलेली आहे . ‘ उत्तर प्रदेशची काय परिस्थिती आहे बँकेमध्ये आरामात बैल फिरत आहे ‘ असे कॅप्शन देऊन त्यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला असून सुदैवाने विशेष या बैलाने कुणालाही काही इजा केली नाही . आत आला काही काळ आराम केला आणि त्यानंतर तो निघून गेला. 


शेअर करा