‘ मोदी की गॅरंटी ‘ नावाने भाजपचा जाहीरनामा,  तृतीयपंथीय व्यक्तींसोबत गरिबांसाठी काय ? 

शेअर करा

मोदी की गॅरंटी

काँग्रेसने आपला जाहीरनामा न्यायपत्र नावाने जाहीर केलेला असून भारतीय जनता पक्षाने देखील आज जाहीरनामा जाहीर केलेला आहे.  भाजपच्या जाहीरनाम्यात नेहमीप्रमाणे मोठी मोठी स्वप्ने दाखवण्यात आलेली आहेत. भाजपकडून मोदी हाच चेहरा पुढे करण्यात आलेला असून भाजपच्या जाहीरनाम्यात काँग्रेसच्या तुलनेत सर्वसामान्य नागरिकांसाठी फारसे काही आश्वासक दिसून येत नाही. मोदी की गॅरंटी नावाने हा जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आलेला आहे . 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपचा हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून त्याला ‘मोदी की गारंटी’ हे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जाहीरनामा प्रसिद्ध करतेवेळी उपस्थित होते. 

काय आहेत महत्वाच्या घोषणा

  • पुढील पाच वर्षे गरीबांना मोफत धान्य
  • आणखी तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार
  • गरिबांसाठी तीन कोटी घरे बांधणार
  • ७० वर्षांवरील लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ
  • तृतीयपंथी समुदायाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ
  • घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस पोहचवणार
  • मुद्रा योजनेची व्याप्ती २० लाखांपर्यंत वाढवणार
  • ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ या पुढेही दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार
  • महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार
  • कोट्यवधी लोकांची वीजबिल शून्य करणार
  • पंतप्रधान आवास योजनेत दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल
  • 5G चा विस्तार करण्यात येणार असून 6G वर काम सुरु

शेअर करा