पुणे हादरले.. घोराडेश्वर डोंगरात चुलत दीरासोबत मॉर्निंग वॉकला महिला गेली अन त्यानंतर..

शेअर करा

पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले असताना अशीच एक धक्कादायक घटना पुण्यानजीक देहूरोड येथील घोराडेश्वर डोंगरात उघडकीस आली आहे. चुलत दीरासोबत डोंगरात पहाटे फिरायला गेलेल्या महिलेचा खून झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. सदर महिलेचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला आणि पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता हा खून तिच्या चुलत दीरानेच केल्याची माहिती समोर आली आहे . आधी या दिराने तिचा गळा आवळून हत्या केली आणि नंतर मृतदेह ओळखू येऊ नये म्हणून तिचे डोके दगडाने ठेचलेले आढळून आले.

उपलब्ध माहितीनुसार , मृत महिला रविवारी पहाटे आपल्या चुलत दीरासोबत घोराडेश्वर डोंगरावर फिरायला गेली होती. दोघांमध्ये गप्पा सुरु असताना या दिराने दीराने मृत महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली मात्र पीडित महिलेनं शारीरिक संबंधासाठी नकार दिला. त्यावरून त्यांच्यात पहाटे पहाटे भांडणे देखील झाली आणि त्यानंतर वहिनीने लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने चिडलेल्या आरोपी चुलत दीराने पीडितेची थेट गळा आवळून हत्या केली .तुकाराम कोंडीबा धडस असं अटक केलेल्या 24 वर्षीय आरोपी चुलत दीराचं नाव असून मयत महिला ही देहूरोड येथील थॉमस कॉलनीत रहायला होती.

नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेची ओळख पटू नये, म्हणून तिचं दगडाने डोकं ठेचलं आणि पीडितेचा मृतदेह एका झुडुपात टाकून घटनास्थळावरून पळ काढला . सोमवारी सकाळी काही स्थानिक नागरिकांनी हा मृतदेह पाहिल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली पोलिसांना माहिती कळताच त्यांनी अवघ्या काही तासात आरोपी दीराला गजाआड केलं आहे. या घटनेचा पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.


शेअर करा