नगर ब्रेकिंग..नगर जिल्ह्यात पुन्हा ‘ हनी ट्रॅप ‘ चा बळी

शेअर करा

नगर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून हनी ट्रॅप गुन्हे प्रकरणाची व्याप्ती वाढत चाललेली आहे. सुरुवातीला सोशल मीडियावर मैत्री करायची आणि त्यानंतर संबंधित तरुणाला ब्लॅकमेल करत त्याच्याकडून पैसे उकळायचे, हा प्रकार नगरसह पूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

प्रेमाच्या जाळ्यात फसलेल्या एका तरुणाने नगर जिल्ह्यातील अकोले येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सुगाव खुर्द ( तालुका अकोले ) येथे बुधवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली असून सुदर्शन चंद्रकांत राजगुरू ( वय 22 ) असे मयत तरुणाचे नाव आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सुदर्शन राजगुरू याने ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगची पदविका घेतली होती त्यानंतर नाशिक येथे एका नामांकित कंपनीमध्ये तो कामाला असताना एका महिलेने त्याला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आणि काही कालावधीनंतर त्याची आर्थिक पिळवणूक सुरू केली, त्यानंतर सुदर्शन याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आणि त्याला दोन महिने तुरुंगात राहावे लागले.

गुन्हा दाखल झाल्यानंतर हाती आलेली नोकरी देखील गेली शिवाय दोन महिने तुरुंगात राहावे लागले यामुळे मानसिक दृष्ट्या तो पूर्णतः हा खचला होता अशा परिस्थितीत संबंधित महिलेने त्याच्याकडे दोन लाखांची मागणी केली मात्र सुदर्शन हा आर्थिक दृष्ट्या देखील कमकुवत असल्याने तो महिलेची मागणी पूर्ण करू शकला नाही आणि पुन्हा काही कारवाई शकेल या भीतीनेअखेर त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला.


शेअर करा