‘ शेतकऱ्यांवर गाडी चढवली ‘ प्रकरणातील साक्षीदार आता निशाण्यावर , गाडीत गाठले अन ..

शेअर करा

केंद्र सरकारकडून काळे कृषी कायदे परत घेण्यात आले असले तरी लखीमपूर हिंसाचार खटला अद्याप न्यायालयात सुरू आहे. भारतीय किसान युनियनचे नेते आणि लखीमपुर-खीरी येथील हिंसाचार प्रत्यक्षपणे पाहणारे साक्षीदार असलेले दिलबाग सिंग यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केलेला आहे. आपला आवाज दाबण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आलेला असल्याचे दिलबाग सिंग यांनी म्हटले असून सदर प्रकरणी तपास सुरू आहे.

भारतीय किसान युनियनचे जिल्हाध्यक्ष असलेले दिलबाग सिंग हे अलीगंज रस्त्याने जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला मात्र सुदैवाने ते या गोळीबारात जखमी झाले नाही. दिलबाग सिंग यांनी आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोर यांनी तिथून तात्काळ पलायन केले मात्र या गोळीबारात त्यांच्या गाडीचे टायर पंचर झालेले होते. हल्लेखोरांनी काचेतून गोळीबार करण्याचा प्रयत्न याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी ड्रायव्हर सीट फोल्ड करून दिलबाग सिंग हे खाली वाकल्याने हल्लेखोर देखील पळून गेले.

3 ऑक्टोबर 2021 रोजी लखीमपुर-खीरी येथे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात केंद्रीय मंत्रीपुत्र असलेला आशिष मिश्रा याने शेतकऱ्यांवर गाडी चढवली होती. यानंतर झालेल्या हिंसाचारात चार शेतकरी आणि एक पत्रकार यांच्यासह आठ जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचे आशिष हे पुत्र असून सदर प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक शब्दही बोललेला नाही तसेच अजय मिश्रा यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.


शेअर करा