समाजाला आदर्श म्हणून घटस्फोटीत महिलेशी केले लग्न मात्र दोनच महिन्यात ‘ खेळ खल्लास ‘ : का घडले असे ?

शेअर करा

दोन महिन्यापूर्वीच त्याने एका घटस्फोटीत महिलेशी लग्न केले होते . लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्ने पाहत मोठा एखादा उद्योग उभा करण्याचे त्याचे स्वप्न होते मात्र घटस्फोटीत महिलेशी लग्न केल्यावरून त्याला नातेवाइकांकडून सातत्याने टोमणे मारले जात होते. हा त्रास असह्य झाल्याने तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यात घडली असून निकेश तिरसिंग राजपूत (२७, मुळ रा. कुसुंबा, ता.जळगाव) असे ह्या तरुणाचे नाव आहे.

उपलब्ध माहितीनुसार, दोनच महिन्यापूर्वी निकेशने एका मंदिरात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत घटस्फोटीत महिलेशी लग्न केले होते. तिला दोन मुले देखील होती. जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे दत्तमंदिर जवळ निकेश तिरसिंग राजपूत हा आई, वडीलांसह वास्तव्याला होता. लग्नानंतर पत्नीसह खेडी येथे भाड्याची खोली करुन रहात होता. त्याच्या सुखी संसारात तशी कोणतीच अडचण नव्हती मात्र त्याचा हा विवाह नातेवाईकातील काही लोकांना खुपत होता आणि ते त्याला सातत्याने टोमणे मारत असत .

शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास निकेश घरी आल्यानंतर थोडा तणावात होता. त्यानंतर तो कोणाला काही न सांगता घरातील मागच्या खोलीत गेला आणि गळफास लावून घेतला . रात्री ११.३० वाजता पत्नीच्या हे लक्षात आल्यावर तिने आरडाओरडा करीत शेजारी व नातेवाईकांना बोलावून घेतले. रात्री उशिरा त्याला दवाखान्यात देखील नेण्यात आले मात्र तोवर उशीर झालेला होता .

निकेश याने एक प्रकारे आदर्श विवाह केला होता त्याच्या कुटुंबाची संमती असतानाही जुन्या विचारातील काही नातेवाईकांकडून निकेशला टोचून बोलले जात असल्याची माहिती जवळच्या लोकांकडून देण्यात आली. निकेशचा भाऊ दुबई येथे असून तो त्याला काही दिवसातच उद्योग सुरु करुन देणार होता मात्र त्याच्या आतच सर्व काही संपले. निकेशच्या पश्चात आई,वडील तीन भाऊ असा परिवार आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास महेंद्र गायकवाड व शांताराम पाटील करीत आहे.


शेअर करा