
नगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकातील महापालिकेच्या मालकीचे असलेले गाळे खाली करण्याचे फर्मान मनपा उपायुक्त यांनी काढलेले होते मात्र त्यांनी बजावलेला हा आदेश बेकायदेशीर ठरवत गाळे ताब्यात न घेण्याचा हुकूम जिल्हा न्यायालयाने जारी केलेला आहे.
प्रोफेसर कॉलनी चौकात असलेल्या गाळ्यांच्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याचे महापालिकेचे नियोजन असून हे गाळे खाली करण्याचे आदेश महापालिका उपायुक्त यांनी काढलेले होते. संबंधित गाळे धारकांना नोटीस देखील बजावण्यात आलेला होत्या मात्र एडवोकेट किशोर देशपांडे यांच्यामार्फत जिल्हा न्यायालयात गाळेधारकांच्या वतीने अपील करण्यात आलेले होते तर महापालिकेला देखील यात प्रतिवादी करण्यात आलेले होते.
जिल्हा न्यायाधीश एस एस गोसावी यांनी महापालिका उपायुक्त यांचा हा आदेश रद्दबातल ठरवत हे गाळे ताब्यात न घेण्याचा आदेश जारी केलेला आहे. प्रोफेसर कॉलनी चौक हा व्यापारी दृष्टीने महत्त्वाचा चौक झालेला असल्याकारणाने या ठिकाणी गाळे उभारण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे तर दुसरीकडे आपल्यावर अन्याय झाल्याची कैफियत घेऊन गाळेधारक न्यायालयापर्यंत पोहोचलेले होते .