निवडणुका जशा जशा जवळ येतील तसं , प्रकाश आंबेडकर म्हणतात की..

शेअर करा

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण ट्विट केलेले असून त्यामध्ये येत्या काळात घडणाऱ्या काही संभाव्य घटनांचा देखील त्यांनी अंदाज व्यक्त केलेला आहे. निवडणूक पूर्व अंदाजात त्यांनी देशात येत्या काळात ओबीसी मुस्लिम आणि महिला यांच्यावरील हिंसाचारात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे .

प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये , ‘ आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जशा जशा जवळ येतील तसे देशातील दलित आणि आदिवासी यांच्या विरोधातील अत्याचारात तसेच ओबीसी मुस्लिम आणि महिला यांच्यावरील हिंसाचारात वाढ होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे.

प्रकाश आंबेडकर ट्विटमध्ये पुढे म्हणतात की , ‘ द्वेष जातीवाद आणि मृत्यूच्या व्यापारातील सगळ्यात मोठ्या ठेकेदाराच्या प्लेबुकमधून लिंचिंग , द्वेषयुक्त भाषणे , सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती पसरवणे , दंगली असे बरेच काही निवडले जाईल आणि भाजप आरएसएसच्या गुंडांच्या मार्फत ते राबवले जाईल ‘.दरम्यानच्या काळात काँग्रेस तटस्थ भूमिका घेईल आणि ‘ मोहब्बत की दुकान ‘ चे तुणतुणे वाजवत राहील असा देखील टोला त्यांनी काँग्रेसला लगावलेला आहे.


शेअर करा