‘ न्यायप्रविष्ट प्रकरण ‘ लिहले नाही तर करा तक्रार , शरद पवार गटाकडून नंबर जारी

शेअर करा

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट अशा दोन गटात राष्ट्रवादीची विभागणी झालेली आहे. शरद पवार गटाला तुतारी वाजवताना माणूस असे चिन्ह देण्यात आलेले आहे तर अजित पवार गटाला घड्याळाचे चिन्ह वापरण्यास परवानगी देण्यात आलेली आहे मात्र त्यासोबतच ‘ प्रकरण न्यायप्रविष्ट आहे ‘ असे प्रत्येक ठिकाणी घड्याळ चिन्हासोबत लिहिण्याची सक्त ताकीद अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेली आहे. 

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट करण्यात आलेली असून त्यामध्ये जिथे कुठे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार तसेच कार्यकर्ते यांनी घड्याळाचे चिन्ह वापरले मात्र त्यासोबत ‘ प्रकरण न्याय प्रविष्ट आहे ‘ असे लिहिले नाही असे आढळून आल्यास 022-35347400 या नंबरवर संपर्काचे आवाहन करण्यात आलेले आहे सोबतच ईमेल ऍड्रेस देखील देण्यात आलेला असून [email protected] या ईमेलवर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. 

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर मोठ्या संख्येने आमदार अजित पवार गटात दाखल झालेले होते ‘ तुतारी वाजवताना माणूस ‘ असे चिन्ह राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाला देण्यात आलेले आहे .  राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे अनेक आमदार आणि कार्यकर्ते सध्या घड्याळ चिन्हाचा वापर करतात मात्र त्यासोबत’ प्रकरण न्याय प्रविष्ट आहे ‘ असे तुरळकच आढळून येत असून  त्या विरोधात आता शरदचंद्र पवार गटाने आक्रमक धोरण अवलंबल्याचे दिसत आहे. 


शेअर करा