सेवेच्या आडून सुरू होता ‘ धर्मांतराचा धंदा ‘, आदिवासी बांधवांनी लावलं पिटाळून

शेअर करा

आदिवासींच्या गरीब आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत त्यांना सोयी सुविधा देण्याच्या बहाण्याने त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रकार पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिम येथील माकणे ग्रामपंचायत हद्दीत समोर आलेला असून आक्रमक झालेल्या आदिवासींनी त्यानंतर ख्रिश्चन मिशनरीचा हा डाव हाणून पाडलेला आहे. 

माकणे गावात ख्रिश्चन धर्माची प्रार्थना सुरू होती आणि त्यानंतर धर्मांतर करण्यात येणार असल्याची माहिती काही आदिवासी तरुणांना मिळाली आणि त्यांनी इतर ग्रामस्थांना हाती घेत हा डाव हाणून पाडला. सदर घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल झालेला आहे. 

आदिवासी बांधवांपर्यंत अनेक सोयी सुविधा पोहोचत नसल्याने तसेच प्रशासकीय पातळीवर देखील त्यांची हेळसांड होत असल्याने ख्रिश्चन मिशनरींनी त्यांना आपल्या मोहोजालात अडकवत धर्मांतर केल्याचे प्रकार रोज समोर येत असतात. शुक्रवारी ही घटना समोर आलेली असून ग्रामस्थांनी ख्रिश्चन मिशनरींना या ठिकाणावरून पळवून लावलेले आहे. 


शेअर करा