शिर्डीतलं अखेर ठरलं.. उद्धव ठाकरे गटाकडून पत्रक काढून घोषणा

शेअर करा

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असून महाविकास आघाडीच्या उमेदवाराची मात्र अधिकृतपणे अद्याप घोषणा झालेली नाही. निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके महाविकास आघाडीच्या उमेदवार राहणार हे स्पष्ट झालेले असले तरी अधिकृत घोषणा मात्र अद्यापपर्यंत झालेली नाही. 

दुसरीकडे शिर्डी मतदारसंघात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या वतीने भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव फायनल करण्यात आलेले असून त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे उभे राहिलेले आहेत. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून काढण्यात आलेल्या पत्रकामध्ये खालील नावे निश्चित करण्यात आलेले आहेत. 

१) बुलढाणा उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर 

२) यवतमाळ – वाशिम श्री. संजय देशमुख

३) मावळ श्री. संजोग वाघेरे पाटील

४) सांगली श्री. चंद्रहार पाटील

५) हिंगोली श्री. नागेश पाटील आष्टीकर

६) संभाजीनगर श्री. चंद्रकांत खैरे

७) धारशीव श्री. ओमराजे निंबाळकर

८) शिर्डी श्री. भाऊसाहेब वाघचौरे

९) नाशिक श्री. राजाभाऊ वाजे

१०) रायगड श्री. अनंत गीते

११) सिंधुदुर्ग – रत्नागिरी श्री. विनायक राऊत

१२) ठाणे श्री. राजन विचारे

१३)मुंबई – ईशान्य श्री. संजय दिना पाटील

१४)मुंबई – दक्षिण श्री. अरविंद सावंत

१५)मुंबई – वायव्य. श्री. अमोल कीर्तिकर

१६) परभणी श्री. संजय जाधव 


शेअर करा