शिरूर लोकसभा मतदार संघात अटीतटीची लढाई , अमोल कोल्हे यांचा प्रतिस्पर्धी ठरला..

शेअर करा

शिरूर लोकसभा मतदारसंघात काही वर्षांपूर्वी शिवसेनेत कार्यरत असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केलेला असून अजित पवार यांच्या उपस्थितीत आंबेगाव तालुक्यातील मंचर इथे हा प्रवेश सोहळा पार पाडला. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर तात्काळ त्यांना उमेदवारी देण्याची घोषणा अजित पवार यांनी केलेली असून आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात संघर्ष रंगणार आहे. मागील निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने अमोल कोल्हे यांनी ही निवडणूक जिंकलेली होती. 

अजित पवार यांनी यावेळी बोलताना , ‘ तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येणार ही वस्तुस्थिती आहे. राज्यात आणि केंद्रात एकाच विचाराचे सरकार आले तर विकास कामांना निधी कमी पडत नाही ‘, असे म्हणत शिवाजीराव आढळराव पाटील यांना विक्रमी मताने विजयी करण्याचे आवाहन केलेले आहे.


शेअर करा