‘ हातात चाराणे टेकवल्याप्रमाणे..’ , रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा

शेअर करा

राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर अनेक नवीन जुन्या आमदारांना घेऊन बाहेर पडलेले अजित पवार उपमुख्यमंत्री झाले मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला अवघ्या चार जागा संपूर्ण राज्यात देण्यात आलेल्या आहेत. शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी यावरून अजित पवार यांना खिजवले असून यासंदर्भात ट्विटरवर एक पोस्ट केलेली आहे . 

ट्विटर वर केलेल्या पोस्टमध्ये आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे की , ‘ एरवी रुबाबदारपणे तिकिटं वाटणाऱ्या हातांना आज तिकिटांसाठी हात पुढं करावे लागत असतील आणि तेही हातात चाराणे टेकवल्याप्रमाणे चार तिकिटं पडत असतील तर त्या रुबाबदार हातांना मानणाऱ्यांचाही हा अवमान आहे. एकेकाळचा त्यांचा फॅन आणि कार्यकर्ता म्हणून दुःख या गोष्टीचं वाटतं की, एक मोठा नेता महाशक्ती कडून हळूहळू संपवला जातोय..आज लोकसभेला मॅनेज करतील आणि उद्या विधानसभेला पूर्णपणे डॅमेज करतील…’ 


शेअर करा