‘ वेगळा विचार ‘ करण्याचे रामदास आठवले यांचे सूतोवाच , बारा वर्षांपासून आम्ही.. 

शेअर करा

शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीने सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या जागेसाठी प्रयत्नशील असलेले रामदास आठवले यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करत ‘ वेगळा विचार ‘ करण्याचे संकेत दिलेले आहेत. 

पुण्यामध्ये बोलताना रामदास आठवले यांनी , ‘ गेल्या बारा वर्षांपासून आम्ही भाजपसोबत आहोत. आम्ही ज्यांच्यासोबत असतो ते सत्तेत येतात असा आमचा आतापर्यंतचा इतिहास आहे. महायुतीत नव्याने सहभागी झालेले एकनाथ शिंदे , अजित पवार यांना महत्त्वाचे स्थान दिले जाते मात्र दिले जाते. सरकारच्या कार्यक्रमात कुठल्याही ठिकाणी माझा फोटोही लावला जात नाही आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा झेंडा देखील लावला जात नाही. महायुतीत सन्मान आणि भागीदारी मिळाली पाहिजे असा आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी शिर्डी आणि सोलापूर मतदार संघाच्या दोन जागा आम्हाला द्याव्यात असा आम्ही प्रस्ताव दिला होता मात्र त्यावर साधी चर्चा देखील करण्यात आलेली नाही.  सोलापूरच्या जागेसाठी आम्ही प्रयत्नशील असतानाच भाजपने तिथे उमेदवार जाहीर केला . शिर्डीची जागा दिली तर आम्ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत , असे देखील त्यांनी म्हटले. 


शेअर करा