लॉकडाऊन मध्येच ‘ रासलीला ‘ , हायप्रोफाईल देहविक्रीचा पर्दाफाश

शेअर करा

एकीकडे देशात कोरोनाचे संकट कमी होताना दिसत नाही तर दुसरीकडे शासकीय यंत्रणा कोरोनात व्यस्त असल्याचे पाहून विविध गैरप्रकार सुरु आहेत . मुंबईतील ग्रांट रोड परिसरात मुंबई पोलिसांनी एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी एका दलाल महिलेला अटक केली आहे. तर दोन तरुणींची सुटका केली आहे. या दोन्ही तरुणी मॉडेल असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पण शासकीय नियम धाब्यावर बसून हॉटेल्समध्ये अवैध धंदे सुरूच आहे. मुंबईतील ग्रांड रोड परिसरात एका थ्री स्टार हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला असता सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. ग्रांड रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये देहविक्री सुरू असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून दलाल महिलेला रंगेहाथ पकडले.

पोलिसांनी केलेल्या या रेडमध्ये दोन तरुणींची सुटका केली आहे. या दोन्ही मॉडेल असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही तरुणींचा जबाब नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पिटा अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे. एनसीबीच्या तपासात ड्रग्ज तस्कर सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर आली होती. मुंबईतील ड्रग्ज तस्कर लोकांना ड्रग्जचा पुरवठा करण्यासोबतच सेक्स रॅकेटही चालवतात, हा धक्कादायक खुलासा अटक करण्यात आलेल्या डोंगरीतील लेडी डॉन अशी ओळख असलेली आणि ड्रग्ज तस्कर इकरा कुरेशीने केला होता.

नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, इकरा कुरेशी महिलांची एक टोळी चालवते. तिने मुंबईतील डान्स बार आणि पबमध्ये काम करणाऱ्या 8 ते 10 महिलांची एक टोळी तयार केली आहे. या टोळीत सामील असलेल्या महिला लोकांना खूपच सहज ड्रग्जचा पुरवठा करत असत. इतकेच नाही तर ड्रग्ज विकत घेणारा ग्राहक त्यांच्याकडे सेक्सची मागणी करत असत.

डिमांड आहे तर सप्लाय करावाच लागणार यामुळे या महिला ती मागणी सुद्धा पूर्ण करत असत. यासाठी त्या ग्राहकाकडून अतिरिक्त पैसे सुद्धा घेत असत. इकरा कुरेशी आणि तिची टोळी या गोरखधंद्यासाठी डान्स बार आणि पब यांची निवड करत असे. जेणेकरुन पोलिसांना किंवा एनसीबीच्या अधिकाऱ्यांना संशय येणार नाही. इकराच्या आणखी काही ठिकाणांबाबत एनसीबीला माहिती मिळाली, असून त्या संदर्भात अधिक तपास सुरू आहे.


शेअर करा