महाराष्ट्र हादरला..चिकन विक्रेत्याचा 12 वर्षीय मुलीवर बलात्कार, कुठे घडली घटना ?

  • by

महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून एका चिकन विक्रेत्याने 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज याठिकाणी ही घटना घडली असून आरोपीचे वय २५ वर्षे आहे .आरोपी युवकाने पीडित मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून अन् गुंगीचं औषध देऊन वारंवार बलात्कार केला आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेनं या घटनेची माहिती आपल्या आईला दिली. पीडितेच्या आईनं पोलिसांत गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरु आहे .

उपलब्ध माहितीनुसार, आरोपी तरुणाचं नाव फैय्याज मेहबूब कोकणे असून तो मिरजेतील बोकड चौक येथील रहिवासी आहे. आरोपीचं बोकड चौकात चिकनचं दुकान आहे. याठिकाणी चिकन घ्यायला येणाऱ्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीशी आरोपी कोकणेची काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. यानंतर 22 मार्च रोजी अल्पवयीन मुलगी घरी एकटीचं असल्याचं पाहून आरोपी कोकणे मुलीच्या घरी गेला. आरोपीने पीडितेला घराबाहेर बोलावून नकळत गुंगीची गोळी खायला दिली यानंतर आरोपी तिला तिच्याच घरात घेऊन गेला आणि त्याने बलात्कार केला.

पुढारीने दिलेल्या वृत्तानुसार, घरात गेल्यानंतर आरोपीनं पीडितेला अश्लील व्हिडीओ दाखवून लैंगिक चाळे करायला सुरुवात केली. पीडिता याला विरोध करत असताना आरोपीने जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरचं थांबला नाही, तर त्याने अशाच प्रकारे अनेकवेळा तिच्यावर बलात्कार केला आहे.

सततच्या त्रासाला वैतागून पीडितेनं या घटनेची माहिती तिच्या आईला दिली. पीडित मुलीच्या आईने घटनेची माहिती मिळताच आरोपी तरुणाविरुद्ध मिरज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी फैय्याज मेहबूब कोकणे विरुद्ध बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास मिरज पोलीस करत आहेत.