बँकेची पाच कोटींची फसवणूक करून हवा होता अटकपूर्व जामीन मात्र ..

शेअर करा

कर्जाची परतफेड केल्याची खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून बँक ऑफ महाराष्ट्रच्या सावेडी शाखेची पाच कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपी बंधूंचा जिल्हा व सत्र न्यायाधीश के एस भाकरे यांनी सोमवारी अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. आरोपी भारत अशोक मवाळ व मृदुल अशोक मवाळ असे आरोपींची नावे आहेत.

सदर प्रकरणात दोन महिन्यापूर्वी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एडवोकेट केदार केसकर यांनी युक्तिवाद केला की, आरोपीकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे अफरातफर केलेली रक्कम हस्तगत करायची आहे तसेच आरोपींना मदत करणाऱ्या इतर आरोपींना अटक करून बनावट कागदपत्रे कशी तयार केली गेली याची देखील माहिती घेणे गरजेचे आहे.

तपासी अधिकारी यांना सखोल चौकशी करायची असल्याने आरोपींची पोलिस कोठडी हवी असल्याचा एडवोकेट केदार केसकर यांनी युक्तिवाद केला. त्यामुळे आरोपींचा फसवणूक करण्याकामी असलेला प्रत्यक्ष सहभाग व मोठ्या रकमेची फसवणूक आदी बाबी लक्षात घेत न्यायालयाने मवाळ बंधूंचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला .


शेअर करा