कोरोनाने पती जाताच दिराने केला वहिनीवर बलात्कार , प्रकरण पोलिसात जाताच पोलिसही म्हणाले..

शेअर करा

देशात कोरोनाने कित्येक संसार उद्धवस्त केले आहे .कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर पत्नीला किती दुःख भोगावे लागते याची कल्पनाही करवत नाही असे असतानाच उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका विधवा वहिणीवर नराधम दिराने बलात्कार केला आहे. नराधम फक्त एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्याच्या बहिणींच्या मदतीने पीडितेला प्रचंड मारहाण केली.

उपलब्ध माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरात ही घटना घडली आहे. विधवा महिला पोलिसात तक्रारीसाठी घराबाहेर पडली तेव्हा नराधम दिराने तिला आपल्या बहिणींसह रस्त्यावर लोळून, जमिनीवर खाली पाडून प्रचंड मारहाण केली. या मारहाणीचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले असून विशेष म्हणजे आरोपीच्या बहिणींनी देखील एक महिला असूनही आपल्या वहिनीची बाजू घेतली नाही.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरातील लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली होती त्याच भयावह काळात पीडितेच्या पतीचं 26 मे रोजी निधन झालं होतं. पतीच्या निधनानंतर पीडित महिला एकटी पडली. याच गोष्टीची फायदा घेऊन दिराने पीडितेवर बलात्कार केला. पोलिसात तक्रार करण्यासाठी जात असताना देखील जबर मारहाण करण्यात आली.

पीडितेला आठ वर्षांचा मुलगा असून आरोपींनी त्या मुलाला देखील मारहाण केली. कशीबशी करून महिला पोलिसात पोहचली खरी मात्र पोलिसांकडून तिला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पोलिसांनी तिला प्रकरण मिटवून घेण्याचा सल्ला दिला. पोलीस तक्रार लिहिण्याऐवजी तिच्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत होते.

अखेर हे प्रकरण पोलीस आयुक्त संजीव त्यागी यांच्यापर्यंत पोहोचलं. त्यांनी तातडीने या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. मात्र, गुन्हा दाखल करण्याआधीच आरोपी दिर आणि त्या बहिणींनी पीडितेला प्रचंड मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात मारहाण आणि बलात्काराचे वेगवेगळे गुन्हे दाखल केले.


शेअर करा