चित्रा वाघ यांच्यावर तब्बल ‘ इतक्या ‘ कोटींचा अब्रुनुकसानी दावा दाखल करणार

शेअर करा

गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ या माझी बदनामी करत आहेत. मला अटकपूर्व जामीन मंजूर असताना देखील आणि प्रकरण न्यायप्रविष्ट असताना माझ्यावर आरोप करून चित्रा वाघ या माझी बदनामी करत आहेत म्हणून त्यांच्यावर दहा कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय रघुनाथ कुचिक यांनी घेतलेला असून तशी नोटीस त्यांनी एडवोकेट हर्षद निंबाळकर यांच्यामार्फत चित्रा वाघ यांना पाठवलेली आहे.

गुन्हा दाखल झाल्यावर चित्रा वाघ यांनी रघुनाथ कुचिक यांच्यावर हल्लाबोल केला होता आणि त्यांना जामीन मिळाल्यावर देखील प्रश्न उपस्थित केले होते . संबंधित तरुणी यांच्यामधील दूरध्वनी संवाद पुढे आणत वाघ यांनी राज्य सरकारवर देखील आरोप केले होते. रघुनाथ कुचिक यांचे वकील हर्षद निंबाळकर यांनी म्हटले आहे की चित्रा वाघ यांच्या आरोपांमुळे त्यांची सामाजिक बदनामी झालेली आहे. त्यामुळे आम्ही अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असून हा दावा 10 कोटी रुपयांचा आहे. नुकसान भरपाई त्यांनी न दिल्यास त्यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्ही स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ‘

दुसरीकडे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुषमा सातपुते यांनी, ‘ एका मुलीच्या भावनांचा गैरवापर करत स्वतःची राजकीय पोळी भाजणाऱ्या चित्रा वाघ यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी यांची हीच संस्कृती आहे का ? असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित उपस्थित केला आहे .


शेअर करा