कौतुकास्पद ..’ नको जात नको धर्म ‘ महाराष्ट्रातील महिला वकील म्हणतात की ..

शेअर करा

देशात सध्या धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रकार मोठ्या प्रमाणावर केले जात असून या सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारी एक बातमी चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आलेली आहे. चंद्रपूर येथील रहिवासी असलेल्या प्रितिषा साहा यांनी स्वतःला जात आणि धर्म नसल्याचे प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केलेला असून त्यांना जिल्हा प्रशासनाने हे पत्र दिल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.

प्रितिषा साहा या व्यवसायाने वकील असून चंद्रपूर येथील सरकारनगर परिसरात राहतात. हिंदू कुटुंबातील बनिया जातीत त्या वाढलेल्या असून देशातील सद्य स्थिती पाहता त्यांनी स्वतःला जात आणि धर्म यापासून मुक्त करावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. संविधानाच्या कलमानुसार प्रत्येकाला आपला धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य आहे तसेच धर्मापासून अलिप्त राहण्याचा देखील अधिकार आहे, त्याद्वारे त्यांनी संविधानातील मूल्य आणि तत्वे यावर आपला विश्वास असून ‘ नो कास्ट नो रिलिजन ‘ प्रमाणपत्र मिळावे म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केलेला आहे.

याआधी 5 फेब्रुवारी 2019 रोजी तामिळनाडूच्या वकील असलेल्या स्नेहा प्रतिमा राजा यांनी देखील अशाच पद्धतीचे एक प्रमाणपत्र मिळवले होते. सदर प्रमाणपत्र मिळवणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला ठरल्या होत्या त्यानंतर यांना प्रीती साहा यांना जर प्रमाणपत्र प्रशासनाने दिले तर हा एक महाराष्ट्रातील मोठा निर्णय ठरणार आहे.


शेअर करा