ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणावरून चंद्रकांत पाटील यांचे शिवसेनेला आव्हान

शेअर करा

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसी बांधवांची फसवणूक केल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेला असून मंत्रालयावर धडक मोर्चा बुधवारी काढण्यात आला होता त्यावेळी मुंबई येथे त्यांनी हा आरोप केलेला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘ महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्त्या सरकारने राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण गमावलेले असून या सरकारला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचेच नाही त्यामुळे ते या विषयाचा अभ्यास करत नाहीत आणि त्यात मार्ग देखील काढत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपले आव्हान आहे की त्यांनी एकदा जाहीरपणे ओबीसी राजकीय आरक्षणासाठी तिहेरी चाचणी काय आहे आणि एम्पिरिकल डाटा कसा गोळा करायचा हे सांगावे. ‘

न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली असली तरी भाजप पक्षाच्या स्तरावर 27 टक्के ओबीसी व्यक्तींना तिकीट देऊन आरक्षण लागू करणार आहे. महाविकास आघाडी सरकारची दानत नसेल तर किमान शिवसेनेने जाहीर करावे की भाजपचे अनुकरण करत आम्हीदेखील 27% ओबीसींना तिकिटे देऊ.

सदर मोर्चाला माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहिर ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.


शेअर करा