राष्ट्रवादीचे नेते महबूब शेख यांनी भाजपला ठणकावले ,’ ईडी, सीबीआय, एनसीबी या. .’

शेअर करा

‘ राज्यातील महाविकास आघाडी ही सर्वसामान्यांसाठी काम करत असून भाजप मात्र इडी, सीबीआय, एनसीबी या सारख्या सरकारी संस्थांना हाताशी धरून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयोग करत आहे मात्र जनता भक्कमपणे महाविकास आघाडी सरकारच्या पाठीमागे उभी असल्याने कोणतीच काळजी करण्याचे कारण नाही, ‘ अशा शब्दात राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी भाजपला ठणकावले आहे

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे शरद युवा संवाद यात्रा यात्रेच्या दरम्यान बोलताना महबूब शेख म्हणाले की, ‘ भावी काळात तरुणांनी पुढे येऊन संघटना मजबूत करण्यास हातभार लावावा तसेच पक्षातही नवीन युवकांना संधी देण्यात यावी. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती आदी निवडणुकांत मोठ्या ताकतीने राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणावेत ‘ असेही ते पुढे म्हणाले

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्‍याम शेलार यांनी देखील यावेळी बोलताना, ‘ असे एकही क्षेत्र नाही जिथे शरद पवार यांचे योगदान नाही. देशातील पहिली कर्जमाफी संत तुकाराम यांनी केली होती तर दुसरी कर्ज माफी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि तिसरी सर्वात मोठी कर्जमाफी ही शरद पवार यांनी केली होती. शरद पवार यांनी सातत्याने शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका घेतलेली असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पवार सतत आग्रही असतात. सर्व जाती धर्माच्या लोकांना समान संधी देणाऱ्या शरद पवार यांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम युवकांनी करावे, ‘ असेही ते पुढे म्हणाले.


शेअर करा