‘ बाभळेश्वरच्या लॉजवर या..’ प्रकरणात ‘ गुरुची विद्या गुरूला ‘ , पैसे घेऊन बाहेर पडली अन..

शेअर करा

नगर जिल्ह्यातील खळबळजनक ‘ बाभळेश्वरच्या लॉजवर या सगळा हिशोब क्लिअर करते ‘ प्रकरणात सहभागी असलेल्या महिलेला अटक करण्यात आलेली असून संगमनेर तालुक्यातील या महिलेने एका सामाजिक कार्यकर्त्याला वेळोवेळी ब्लॅकमेल करून त्याच्याकडून तब्बल चाळीस लाखांपेक्षा अधिक रक्कम उकळल्याचे समोर आले आहे. सातत्याने तिच्याकडून होत असलेल्या ब्लॅकमेलला वैतागून पीडित व्यक्तीने पोलिसात धाव घेतली होती त्यानुसार तिला रंगेहाथ पकडण्यात आले मात्र तिला पकडण्यासाठी पोलिसांनी लावलेल्या टेक्निकची देखील जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील हा गृहस्थ असून गावातील एका महिलेने त्याच्यासोबत ओळख वाढवत तिचा आणखी एक सहकारी राजेंद्र गिरी याला मदतीला घेऊन पीडित व्यक्तीला आपल्या जाळ्यात अडकवले होते.

पीडित व्यक्तीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘ एका सामाजिक कार्याच्या निमित्ताने या महिलेची प्राथमिक आरोग्य केंद्रात ओळख झाली होती त्यानंतर तिने सुरुवातीला दोन लाख रुपये आपल्याकडून उसने घेतले आणि ते परतही केले मात्र त्यानंतर तिने पुन्हा पाच लाख रुपये उसने घेतले आणि शेती विकल्यानंतर तुमचे पैसे देईल असे तिने सांगितले. त्यानंतर तिने फिर्यादीला काही चेक देखील दिले मात्र यानंतरही तिने फिर्यादी यांच्याकडून वीस लाख रुपये घेतले आणि त्यानंतर तिने संपर्क तोडून टाकला.

फिर्यादी यांनी वेळोवेळी तिच्याकडे पाठपुरावा करत अखेर तिचा संपर्क झाला आणि तिने सात मार्च २०२२ रोजी त्यांना बाभळेश्वर येथे येण्यास सांगितले. रक्कम मोठी असल्याने रस्त्यात मोजता यायची नाही म्हणून तुम्ही लॉजमध्ये या असे ती म्हणाली आणि फिर्यादी तिथे पोहोचले असता एक व्यक्ती धाडकन रूमचा दरवाजा उघडून आत आला आणि त्याने फिर्यादी सोबत भांडण सुरू केले याच दरम्यान या महिलेने स्वतःच्या अंगावरील कपडे काढले आणि तिच्या सोबतच्या पुरुषाने याचे रेकॉर्डिंग केले आणि फिर्यादी महिलेशी संबंधित व्यक्तीचे शारीरिक संबंध आहेत असे त्याच्याकडून वदवून घेण्यात आले आणि पुन्हा त्याच्याकडून नऊ लाख रुपयांची मागणी करण्यात आली.

त्यांच्याकडून पैशाची मागणी होत असल्याने हतबल झालेले तक्रारदार यांनी अखेर पोलिसात तक्रार देत पोलिसांच्या मदतीने तिचाच फॉर्म्युला तिला वापरण्याचे ठरवले आणि पैसे घेण्यासाठी शिर्डी इथे बोलावले मात्र दरम्यानच्या काळात पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आलेला होता त्यानुसार पोलिसांनी पद्धतशीरपणे फिल्डिंग लावली आणि फिर्यादीला मोबाईल रेकॉर्डिंग सुरू ठेवण्यास सांगितले यामध्ये महिलेने पुन्हा एकदा वीस लाख रुपयांची मागणी केली आणि त्यानंतर तिथून पलायन करत असतानाच पोलिसांनी तिला ताब्यात घेतले

तिच्या ताब्यात त्यावेळी फिर्यादीकडून घेण्यात आलेल्या नोटा आढळून आल्या. पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी ही कारवाई केली असून सदर प्रकरणाचा तपास सुरू आहे. नगर शहरानजीक खातगाव टाकळी, वडगाव गुप्ता येथे देखील अशाच स्वरूपाच्या घटना आधी समोर आलेल्या असून स्मार्ट फोनच्या माध्यमातून व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करत अशा पद्धतीने गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत आहे.


शेअर करा