‘ राजापूरचे मावळे ‘ ग्रुपवर अमृता फडणवीस यांची बदनामी ?, कारवाई करण्याची मागणी

शेअर करा

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असतात. आपल्या मधुर आवाजामुळे त्यांचे फॅन फॉलोईंग देखील मोठ्या प्रमाणात असून राजकीय विरोधामुळे अनेकदा त्यांच्यावर देखील निशाणा साधला जातो. अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर येथे समोर आलेली असून अमृता फडणवीस यांचा मुलाखत देतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून त्याखाली बदनामीकारक असा मजकूर टाकण्यात आला. सदर व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी भाजपा सरकार आघाडीचे रत्नागिरी जिल्हा संयोजक अनिलकुमार करंगुटकर यांनी केली आहे.

सदर प्रकरणी त्यांनी राजापूरचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे पत्र दिलेले असून त्यामध्ये अमृता फडणीस या माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या पत्नी असून अशा मेसेजमुळे महिलेची बदनामी करण्यात आलेली आहे. सदर मेसेज हा राजापूरचे मावळे या ग्रुपवर रात्री साडेदहा वाजता टाकण्यात आला होता असे म्हणत त्यांनी या संदर्भातील पुरावे दिलेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीची अशाप्रकारे बदनामी करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी असे त्यांनी म्हटले आहे.


शेअर करा