वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेचे पोलीस हवालदारावर खळबळजनक आरोप

शेअर करा

एक खळबळजनक घटना मुंबई येथे उघडकीला आली असून सेक्स वर्करच्या अड्ड्यावर रेड केल्यानंतर पोलीस ठाण्यात आणण्यात आल्यावर पुन्हा घरी सोडण्याच्या बहाण्याने 42 वर्षाच्या एका पोलिस कॉन्स्टेबलने बलात्कार केल्याचा आरोप केला जात आहे. मुंबईतील एम एच बी पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदारावर वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेने हा आरोप केलेला असून पोलिसांनी छापा टाकला. त्यात काही निष्पन्न झाले नाही त्यानंतर या महिलांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते आणि पुन्हा घरी सोडण्याच्या बहाण्याने हवालदाराने आपल्यावर बलात्कार केला असे या महिलेचे म्हणणे आहे.

घरी सोडण्याच्या बहाण्याने हवालदाराने आपल्याला सोबत घेतले. आधी आम्ही एकत्र जेवण केले आणि त्यानंतर त्याने हॉटेलच्या रूममध्ये जाऊन आपल्यावर बलात्कार केला असे महिलेचे म्हणणे असून याप्रकरणी कानाकिया पोलीस स्टेशन गाठत महिलेने आपली तक्रार दिलेली आहे. महिलेच्या म्हणण्याप्रमाणे, ‘ 10 ऑगस्ट रोजी ही घटना घडलेली असून एम एच बी पोलिसांना त्यांच्या कार्यक्षेत्रात वेश्याव्यवसायाची रॅकेट कार्यरत आहे अशी माहिती मिळाली होती मात्र त्यात कुठलेही तथ्य आढळून आले नाही तरीही पोलिसांनी चौकशीसाठी दिवसभर एका वर्करची सेक्स वर्करची चौकशी केली आणि त्यानंतर तिला सोडून दिले .’

मीरा रोड येथे आपण राहत असून आरोपी कॉन्स्टेबल राजरतन काळे यांनी आपल्याल रात्री तुला घरी सोडतो असे आश्‍वासन दिले मात्र त्याऐवजी तो आपल्याला सोबत घेऊन एका हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला आणि त्यानंतर हॉटेलच्या एका खोलीत त्याने आपल्यावर बलात्कार केला असे महिलेचे म्हणणे आहे. सदर प्रकरणी तिने लेखी तक्रार दिली असून या प्रकरणी पोलीस तपास सुरू असल्याचे समजते.


शेअर करा