अखेर ‘ तो ‘ खून समलैंगिक संबंधातून झाल्याचे समोर , महाराष्ट्रातील घटना

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असा प्रकार नागपूर इथे समोर आलेला असून समलिंगी संबंधातून आपल्या पार्टनरची हत्या करणाऱ्या एका व्यक्तीला कोराडी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत . नागपूरमधील खापरी गावात गुरुवारी ही घटना समोर आलेली असून मयत व्यक्तीचे वय 45 वर्ष असल्याचे समजते.

उपलब्ध माहितीनुसार, घनश्याम गणपत सिरसाम ( वय 45 वर्ष राहणार शिवनी मध्य प्रदेश सध्या राहणार खापरी नागपूर ) असे मयत व्यक्तीचे नाव असून त्याचा समलिंगी संबंधातील पार्टनर असलेला संदीप चंद्रभान गोडांगे ( वय 23 वर्ष राहणार खापरी ) असे आरोपीचे नाव आहे. घनश्याम हा या प्रकरणातील फिर्यादी असलेले नरेश देहुरे यांच्याकडे कामाला होता. गाईंच्या गोठ्यात तो काम करत होता तर आरोपी संदीप हा देखील मिळेल ते काम परिसरात करत असायचा याचदरम्यान त्यांची ओळख झालेली होती.

संदीप आणि घनश्याम यांच्यात समलिंगी संबंध गेल्या काही वर्षांपासुन सुरू झाले होते .बुधवारी संध्याकाळी संदीप हा घनश्याम यांच्याकडे आलेला होता. तिथे दोघांनीही मद्यप्राशन केले आणि शारीरिक संबंध ठेवले मात्र त्यानंतर वाद झाल्यानंतर घनश्याम याने संदीप याला शिवीगाळ केली आणि संतापलेल्या संदीप याने घनश्यामच्या डोक्यावर लाकडी दांड्याने मारहाण केली त्यात घनश्याम याचा मृत्यू झाला.

विवस्त्र अवस्थेतील घनश्याम याचा मृतदेह तिथेच सोडून संदीप याने पलायन केलेले होते मात्र अवघ्या काही तासांच्या आत पोलिसांनी संदीप याला अटक केलेली असून त्याने खुनाची कबुली दिलेली आहे सोबतच समलिंगी संबंधाबाबत देखील त्याने पोलिसांना माहिती दिलेली आहे . सदर प्रकरणी पोलीस तपास करत असल्याची माहिती आहे.


शेअर करा