कोतवालीच्या ‘ त्या ‘ कॉन्स्टेबलबद्दल आधी मनसेची तक्रार , आता महिलेची पोलीस अधीक्षकांकडे धाव

शेअर करा

काही दिवसांपूर्वी नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराच्या साथीदाराला पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने काहीही कारण न देता मारहाण केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता. सदर घटना ताजी असतानाच पुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यातील त्याच कर्मचाऱ्याचा आणखी एक प्रकार समोर आलेला आहे. 

एका महिलेने संबंधित पोलीस कॉन्स्टेबलवर खळबळ जनक आरोप करत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलेले असून त्यामध्ये म्हटल्याप्रमाणे ,’ माझे पती गौरव रमेश कापरे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जात असताना दोन महिला रेसिडेन्शिअल कॉलेजच्या गेटमधून बाहेर येताना माझ्या पतीला दिसल्या . माझ्या पतीने त्यांना कुठल्याही पद्धतीने संपर्क केला नाही मात्र तरीदेखील त्या दोन महिलांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माझ्या पतीच्या विरोधात एनसी दाखल केली. 

सदर महिलेच्या विरोधात सध्या न्यायालयात खटला प्रलंबित आहे . सदर महिला माझ्या पतीच्या विरोधात विनाकारण वारंवार तक्रार दाखल करत असून मला आणि माझ्या पत्नीला सतत जाताना येताना शिवीगाळ करते . 8 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी एक वाजता मी सिविल हॉस्पिटल येथे जात असताना दोन्ही महिला माझ्या पतीला रेसिडेन्सी कॉलेजच्या रस्त्याने जाताना दिसल्या त्यानंतर दोन्ही महिला पोलिसात गेल्या आणि माझ्या पतीच्या विरोधात एनसी दाखल केली. 

माझे पती महिलेचा पाठलाग करतात आणि शिवीगाळ करतात अशा स्वरूपाच्या या तक्रारी या महिला सतत दाखल करत आहेत.  कोतवालीचे पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पवार यांनी दुपारी दोनच्या दरम्यान फोन करून माझ्या पतीला बोलावून घेतले आणि ते तसेच दुसरे एक पोलीस कॉन्स्टेबल यांनी पतीचे काहीही म्हणणे ऐकून न घेता माझ्या पतीला जाडपट्ट्याने बेदम मारहाण केली. वरिष्ठ अधिकारी यांनी देखील या पोलीस कॉन्स्टेबलला माझ्या पतीला मारहाण करू नका म्हणून सांगितले मात्र त्यांनी ऐकून न घेता माझ्या पतीला बेदम मारहाण केलेली आहे. पतीच्या दोन्ही तळहातावर तळपायावर आणि इतर ठिकाणी जखमा झालेल्या असून माझे पती सिविल हॉस्पिटलला उपचारासाठी गेले.

पोलीस कॉन्स्टेबल त्या महिलेच्या सांगण्यावरून कुठलीही शहानिशा आणि चौकशी न करता माझ्या पतीला बेदम मारहाण करतात . पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पवार व इतर यांच्या विरोधात माझी तक्रार असून माझ्या पत्नीच्या विरोधात होणाऱ्या खोट्या-नाट्या बनावट तक्रारी याची सखोल चौकशी करून तक्रारीमध्ये असलेले तथ्य चौकसपणे आणि निपक्ष:पातीपणाने तपासण्यात यावे त्यानंतरच योग्य ती कार्यवाही करावी आणि मला न्याय देण्यात यावा असे महिलेने निवेदनात म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी याच पोलीस कॉन्स्टेबलच्या विरोधात मनसेने देखील आक्रमकता दाखवत अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना या पोलीस कॉन्स्टेबलच्या विरोधात निवेदन दिलेले होते . मनसेच्या विभाग प्रमुखाला देखील याच पोलीस कॉन्स्टेबलने दमदाटी करत शिवीगाळ करून मारहाण केलेली होती . तानाजी काय आहे ते तुला दाखवतो ? असे म्हणत मारहाण केल्याच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना तक्रारदार व मनसेचे विभाग प्रमुख किरण रोकडे , शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र राशिनकर , शहर सचिव संतोष साळवे , संकेत व्यवहारे , महेश चव्हाण यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेले होते. 


शेअर करा