‘ तू दिवसाला हजार रुपये कमावतो त्यातले ‘, नगरमध्ये व्यावसायिकाला मारहाण

शेअर करा

नगर शहरात खंडणीखोरीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून पान टपरी चालवण्यासाठी टपरी चालकाला खंडणी मागत शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आलेली आहे. शहरातील मार्केट यार्ड चौकात बुधवारी सात तारखेला ही घटना घडलेली असून कोतवाली पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , टपरी चालक असलेले जगदीश झुंबर काळोखे ( राहणार त्रिमूर्ती चौक सारसनगर ) यांनी आठ तारखेला कोतवाली पोलिसात फिर्याद दिलेली असून फिर्यादी यांची मार्केट यार्ड चौकात पानाची टपरी आहे. आरोपी टिंग्या उर्फ गणेश पोटे हा सात तारखेला दुपारी साडेतीनच्या सुमारास टपरीजवळ आला आणि त्याने फिर्यादी यांना ‘ तू दिवसाला एक हजार रुपये कमवतो आठवडाभराचे सात हजार रुपये येतात त्यातील 2000 मला दर आठवड्याला देत जा नाहीतर तुला ठार मारेल ‘ असे म्हणत शिवीगाळ करत मारहाण केली. 

फिर्यादी जगदीश काळोखे यांनी त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी टिंग्या याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 385 , 323,  504 , 506 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.


शेअर करा