पोलिसातून निलंबित करण्यात आलेला वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजीत कासले याला अठरा तारखेला पोलीस दलातून अखेर बडतर्फ करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा यांनी ही कारवाई केलेली आहे. ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात त्याला पुण्यात शिवाजीनगर पोलिसांनी अटक केलेली आहे. तीन दिवसांची त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बीड जिल्हा पोलिसात फौजदार म्हणून रणजीत कासले सायबर विभागात काम करत होता एका गुन्ह्याच्या तपासासाठी गुजरातला गेल्यानंतर पैसे घेऊन त्याने आरोपीला सोडून दिले आणि या प्रकाराचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. नागरिकांना सायबर गुन्हा नोंद करण्याच्या देखील तो धमक्या द्यायचा असाही त्याच्यावर आरोप असून 23 तारखेला त्याला सेवेतून निलंबित करण्यात आलेले होते.
चौकशी संदर्भात अनेकदा नोटीसा देऊन देखील तो उपस्थित राहिला नाही सोबतच सोशल मीडियावर तो त्याची भूमिका सातत्याने मांडत असायचा. वाल्मीक कराड याचा एन्काऊंटर करण्यासाठी आपल्याला सुपारी मिळाली होती असाही खळबळजनक दावा त्याने केला आणि त्यानंतर पोलीस दलात देखील या प्रकाराची चर्चा सुरू झाली. काही काळ पोलिसांपासून लांब राहिल्यानंतर अखेर त्याने व्यवस्थित आपण एकटे लढू शकत नाही असे सांगत त्यानंतर तो पोलिसांना शरणाला पोलिसांपुढे शरण आला आहे.