आजपासून तू माझी बायको आणि माझ्या नवऱ्याचीही..समलैंगिक महिलेचा ‘ मास्टरप्लॅन ‘ : महाराष्ट्रातील बातमी

शेअर करा

कोरोनामुळे सर्व जग त्रस्त असताना राज्यात गुन्हेगारी आणि पैशासाठी ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणांनी धुमाकूळ घातला आहे. ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणात बहुतांश महिला आढळून येत मात्र नागपूरमध्ये घडलेल्या ह्या घटनेत चक्क एका नवरा बायको जोडीने दुसऱ्या महिलेला ब्लॅकमेलिंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . काही दिवस पीडित महिलेने हा त्रास सहन केला मात्र नंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली. नागपुरच्या अजनी भागात घडलेली ही घटना आहे.

उपलब्ध माहितीनुसार, नागपूरमध्ये पतीपासून विभक्त असलेली एक महिला नाव मीना ( काल्पनिक नाव ) राहत होती. ती घरमालकीण असल्याने एक दिवस तिच्याकडे घर भाड्याने घेण्यासाठी म्हणून आरोपी रामकिशन जांगीड (वय 40) आणि त्याची पत्नी सरोज (वय 35) आले. भाडे वगैरे ठरवल्यानंतर हे नवीन दाम्पत्य तिथे राहायला आहे. आरोपी रामकिशन याचा फर्निचरचा व्यवसाय आहे .रामकिशन बाहेर असल्याने त्याची पत्नी सरोज हिची आणि घरमालकीण असलेल्या मीनाची चांगली मैत्री झाली.

काही कालावधीत रामकिशन याची पत्नी सरोज ही समलैंगिक असल्याचे मीना हिला समजले आणि मीना ही देखील पतीपासून विभक्त राहत होती त्यामुळे सरोज हिने तिला आपल्या जाळ्यात ओढून तिला समलैंगिक संबंधाची चटक लावून दिली. पती बाहेर गेल्यानंतर तिच्याशी ती समलैंगिक शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होती. हळूहळू अशा संबंधाची मीनालाही चटक लागली.

मीना पूर्णपणे आपल्या जाळ्यात अडकली आहे हे सरोजच्या लक्षात आले होते त्यामुळे तिने एक भयानक असा प्लॅन रचला.मीनाशी लग्न करण्याचा विचार आपल्या पतीला सांगितला. पतीला देखील यात काही धोका वाटला नाही, मात्र जर ती ( मीना ) पत्नीप्रमाणे माझ्याशीही शारीरिक संबंध ठेवेल, तर तुम्हाला लग्नाची परवानगी देईल’, अशी अट त्याने सरोजपुढे ठेवली. सरोजने पतीचे हे म्हणणे मीनाला सांगितले मात्र मीना यास तयार झाली नाही. सरोजच्या प्लॅनमध्ये हा एक मोठा अडथळा होता .

सरोजने आता दुसरा प्लॅन केला. मीनाशी शारीरिक संबंध सुरु असताना अचानक नवऱ्याने यायचे आणि त्यानंतर ह्या गोष्टीचा बोभाटा होऊ नये म्हणून मीनाला ब्लॅकमेल करायचे असा तो प्लॅन होता. ठरल्याप्रमाणे सरोजला आपल्या नवऱ्याला गावी पाठवल्याचे नाटक केले आणि त्यानंतर दोघीमध्ये शारीरिक संबंध सुरु असतानाच अचानक नवरा आला,अर्थात हे सर्व सरोजच्या प्लॅन प्रमाणेच होते .

सरोजच्या नवऱ्याने “दोघींनाही नको त्या अवस्थेत’ बघितले . नवरा रामकिशनने दोघींच्याही कानाखाली वाजवून मीनाच्या आईवडील आणि भावाला बोलवून सांगण्याची धमकी दिली. अर्थात हे सर्व प्लॅन प्रमाणेच होते त्यामुळे सरोजने पतीला समजावण्याचे नाटक केले. “जर मीना मला शारीरिक संबंध प्रस्थापित करू देत असेल तर मी कुणालाही सांगणार नाही,’ अशी अट पती रामकिशनने ठेवली. सरोजने मीनाची समजूत घालून तिला पतीशी संबंध प्रस्थापित करण्यास राजी केले आणि मीनासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपी सरोजने हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये शूट करून ठेवला.

त्यानंतर सरोजच्या हाती जणू घबाडच आल्यासारखे होते. तिने मीनाला पती रामकिशन आणि ती स्वतः यात शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी ब्लॅकमेलिंग सुरु केली. ब्लॅकमेलिंगच्या भीतीने घराची मालकीण असलेल्या मीनाचे रोजच लैंगिक शोषण सुरु झाले.. आम्ही म्हणू तसे वाग, नाहीतर तुझे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी हे दाम्पत्य तिला देऊ लागले. त्यामुळे नाइलाजाने मीनाला रामकिशन आणि सरोजशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायला लागत होते. सरोज विकृत मानसिकतेची असल्याने मीनाला ती शारीरिक त्रास देत होती. अनैसर्गिक संबंधामुळे मीनाची प्रकृती बिघडली.

काही कालावधीनंतर तर हद्दच झाली. ह्या नवरा-बायकोने मीनाकडून स्टॅंपपेपरवर सरोजची पत्नी असल्याचा कागद करून घेतला आणि मीनाला तिचे घर सोडून स्वतःच्या घरात पत्नी म्हणून आणले. मात्र आल्यानंतर पुन्हा पूर्वीप्रमाणेच पती-पत्नीने मीनाचे लैंगिक शोषण सुरू केले. अखेर या संबंधाला कंटाळून मीनाने थेट पोलिस स्टेशन गाठून ह्या दोघांच्या विरोधात तक्रार दिली .


शेअर करा