पुणे हादरलं..क्रूरतेची परिसीमा गाठणाऱ्या ‘ त्या ‘ खुनाचा तपास करताना आणखीन एक..

शेअर करा

पुणे जिल्ह्यात पिंपरी सांडस येथे एका मासे विक्री करणाऱ्या व्यक्तीचा काही दिवसांपूर्वी खून झाला होता. अत्यंत अमानुषपणे केलेल्या या खुनानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता पोलीस चौकशीत आपले काही बरेवाईट होईल या भीतीपोटी भवरापूर येथील एक जणाने विष पिऊन आत्महत्या केली आहे मात्र आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पोलीस जबाबदार नसल्याचे लिहिले आहे मात्र निव्वळ चौकशीच्या दडपणाखाली एका व्यक्तीने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

उपलब्ध माहितीनुसार , बाबासाहेब बबन काटे ( वय 32 राहणार भवरापूर तालुका हवेली ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे तर संतोष उर्फ पोपट तुकाराम गायकवाड ( वय 45 राहणार भवरापूर तालुका हवेली ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

संतोष गायकवाड यांचा मासेमारीचा व्यवसाय होता. बहिनीकडे जातो असे सांगून ते घराबाहेर पडले मात्र त्यानंतर त्यांचा मृतदेह शरीराचे अवयव तोडलेल्या अवस्थेत आढळून आला होता तर इतर शरीराचा काही भाग उरळीकांचन येथे सापडला होता त्यामुळे सदर प्रकरणाचा पोलिस तपास करत असतानाच ही दुसरी घटना समोर आली आहे.

बाबासाहेब काटे यांनी आत्महत्या केल्यानंतर पोलिसांना तिथे एक चिठ्ठी सापडली असून चिट्टी मध्ये त्यांनी, ‘ पोलिसांच्या चौकशीत आपले बरे वाईट होईल या भीतीने आपण आत्महत्या करत आहोत ‘, असे म्हटले आहे. सतत तीन दिवस आपली चौकशी केली जात असल्याने आपल्याला दुःख झाले. हा खून कोणी आणि का केला ? याची मला माहिती नाही . खून करणाऱ्या व्यक्तीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे मात्र मला खूप टेन्शन आले म्हणून मी औषध घेत आहे. पोलिसांना जबाबदार ठरवत नाही, असे देखील चिठ्ठीत नमूद केलेले आहे.


शेअर करा