‘ शेतकऱ्यांच्या हातात पैसे यायला लागले की..’ , काय म्हणाले शरद पवार ?

शेअर करा

यंदाच्या वर्षी साखर आणि गहू यांना चांगला भाव मिळत आहे मात्र शेतकऱ्यांच्या हातात पैसे येताच केंद्र सरकारची धोरणे बदलतात. केंद्राची गहू आणि साखर यांच्यावर निर्यात करण्याची बंदी ही शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणारी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे केले आहे

काय म्हणाले शरद पवार ?

आम्ही शेतकरी हिताचे निर्णय घ्यायचो मात्र आता परिस्थिती बदलली असून साखर कारखानदारीने केवळ साखरेच्या उत्पादनावर अवलंबून राहण्याचे दिवस राहिलेले नाहीत. पूर्वी गुळाची बाजारपेठ असायची आता त्यानंतर साखर कारखानदारी आली. नगर जिल्हा साखर कारखानदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला. मुबलक पाणी असलेल्या भागात सुबत्ता होतीच मात्र तरीदेखील बबनराव ढाकणे यांनी पाणी नसलेल्या दुष्काळी भागात सहकारी साखर कारखाना उभा करण्याचे धाडस केले.

आताच्या काळात साखर एके साखर असे म्हणण्याचे दिवस राहिलेले नाहीत तर साखरेच्या सोबतच इथेनॉल,अल्कोहोल यासारखे पूरक उपक्रम देखील कारखान्यांनी उभारावेत जेणेकरून शेतकऱ्यांच्या हातात जास्तीचे दोन पैसे येतील आणि त्यांना आर्थिक सुबत्ता येईल ‘ असेही ते पुढे म्हणाले.


शेअर करा