मुंबईत खळबळ.. ‘ मैं जा रहा हूं अब कभी नही आऊंगा ‘

शेअर करा

काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड येथे एका अल्पवयीन मुलाने मोबाईलवरील व्हिडीओ पाहून बाहुलीला आधी फाशी दिली आणि त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या केली होती . हा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर अशाच स्वरूपाची दुसरी घटना मुंबई येथे उघडकीला आली असून मालाड परिसरात मोबाईलवर गेम खेळण्यात विरोध केल्याने एका 15 वर्षाच्या मुलाने रागाच्याभरात रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, ओम भरत कथोरिया ( वय 15 ) असे या मुलाचे नाव असून तो सतत मोबाईलवर गेम खेळत बसलेला असायचा. लहान वयात मोबाइल हाती आल्याने त्याचे स्वतःवर नियंत्रण राहिले नाही आणि तो तासंतास मोबाईलमध्ये अडकून राहिला. त्याला मोबाईलची सवय अधिक प्रमाणात लागू नये म्हणून आईने त्याला गेम खेळण्याचा विरोध केला त्यामुळे तो संतप्त झाला आणि आणि घरातून बाहेर पडला. जाण्यापुर्वी त्याने स्वतःची सुसाईड नोट लिहून ठेवली होती त्यामध्ये ‘ मै जा रहा हू अब कभी नही आऊंगा ‘, असे लिहिलेले होते.

घरच्यांनी त्याचा शोध सुरू केला मात्र तोपर्यंत उशीर झालेला होता. त्याने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी त्यानंतर घरच्यांना मिळालेली असून छिन्नविछिन्न झालेला त्याचा मृतदेह घरच्यांनी ताब्यात घेतला आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.


शेअर करा